शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात आणण्यासाठी प्रयत्नांची गरज - ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:40 IST

आमच्या वेळेस राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात होते. आता ते अमरावतीला गेले. ते कसे परत येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव (मामा) यांनी येथे केले. 

ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळाच्या नाट्य महोत्सवास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकेकाळी कलावंत निष्ठावंत होते. निष्ठेने नाटकं बसविली जात. आता अकोल्यात सांस्कृतिक नाट्यगृह उभे होत आहे. त्यामुळे नाटक आणि कलावंतांना चांगला वाव आहे. आमच्या वेळेस राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र अकोल्यात होते. आता ते अमरावतीला गेले. ते कसे परत येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव (मामा) यांनी येथे केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू झालेल्या ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेश थोरात, ज्येष्ठ नाट्यकर्मी व परीक्षक अरुण घाटोळे, श्रीकांत भाके, विकास फटिंगे, पत्रकार श्रीकांत जोगळेकर, अकोला विभागाचे सहायक कल्याण आयुक्त रामेश्‍वर अळणे आदी होते.  ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव म्हणाले, तरुणाईने नाट्यशास्त्र समजून घ्यावे, त्याशिवाय नाटकं करता येत नाहीत. दर्जेदार नाटकं बसविली गेली, तर रसिक वर्गही जोडला जातो. त्यामुळे युवक, युवतींनी नाटकांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून नाट्य स्पर्धेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त रामेश्‍वर अळणे यांनी केले. अळणे यांनी नाट्यकर्मी कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचा मंच मिळावा, या दृष्टिकोनातून ६५ वर्षांपासून नाट्य महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. रंगमंचावर कामकार कल्याण केंद्र शिवणीतर्फे तांडा (ऊसतोडीचा) नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. २५ डिसेंबर ते २३ जानेवारीपर्यंत नाट्य महोत्सव होणार असून, ही नाट्य रसिकांना एक मेजवानीच आहे. कार्यक्रमाचे संचालन सहायक केंद्र संचालक कारंजाचे प्रमोद घोडचर यांनी केले. आभार कल्याण निरीक्षक भास्कर भेले यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधू जाधव, अशोक ढेरे, सुधाकर गीते व डॉ. अशोक ओळंबे प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर