शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे आणखी ७४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 11:56 IST

आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनाकडून दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटपासाठी आणखी ७३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनामार्फत जाहीर करण्यात आली.जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी एकूण ३०५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी मदत वाटपाच्या दोन टप्प्यात १३ डिसेंबरपर्यंत २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी आणखी ७३ कोटी ९० हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने तिसºया टप्प्यातील मदतीचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.दोन टप्प्यात वितरित केलेली अशी आहे मदतीची रक्कम!जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी शासनामार्फत दोन टप्प्यात प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख रुपयांची मदत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आली.अकोला तालुका-४३ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपये, बार्शीटाकळी- २७ कोटी ४३ लाख ५८ हजार रुपये, अकोट -४१ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये, तेल्हारा -२९ कोटी ८५ लाख ८ हजार रुपये, बाळापूर -३२ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये, पातूर -२४ कोटी ५३ लाख रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३१ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये मदतीची रक्कम वितरित करण्यात आली आहे.वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना वाटप करण्यासाठी दोन टप्प्यात शासनाकडून प्राप्त मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसºया टप्प्यातील मदत वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी