लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच आहे, शेतकरी कर्जमुक्त होण्याऐवजी अजूनच कर्जबाजारी झालेला आहे. त्याच्या मालाला भाव तर मिळेनासा झालेला आहे शिवाय मिळालेली रक्कम ताबडतोब हाती येण्याची शक्यता दुरापास्त झालेली आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शेतकर्यांच्या कर्जमुक्तीचा एल्गार पुकारला आहे. शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांंची बैठक माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यातील नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते सदर बैठकीत उपस्थित होते. १0 जून २0१७ चा पक्ष संवर्धन दिन तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रस्तावित विदर्भ दौर्यासंदर्भातील आयोजनांची या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. तालुका पदाधिकर्यांनी शेतकर्यांशी चर्चा करून संदर्भीत समस्या जाणून तयार केलेली ह्यबळीराजाची सनदह्ण तहसीलदारांना निवेदनासह सादर करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. मनोहर पाटील दांदळे यांनी प्रास्तविक केले. यावेळी संतोषकुमार कोरपे, श्रीकांतदादा पाटील पिसे, श्याम अवस्थी, अरविंद घोगरे, डॉ डी.पी. नराजे, डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. युसूफ कादरी, दिलीप आसरे, अजय तापडिया, पद्मावती अहेरकर, पुंडलिक अरबट, भारतकुमार सुरडकर, सै. युसुफ अली, प्रा. सरफराज खान, मंदाताई देशमुख, शिवाजीराव म्हैसने, श्रीकृष्ण बोळे, रामेश्वर वांडे, नीलेश आव्हाळे, बळवंत शिरसाठ, दिवाकर गावंडे, पंकज बाजारे, दिलीप पिवाल, सतीश गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एल्गार
By admin | Updated: May 28, 2017 03:41 IST