शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन मतदारसंघांवर दावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 14:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर व अकोला पश्चिम या दोन मतदारसंघांबाबत आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकोला : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येणारी निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करूनच लढण्याचा राष्ट्रवादीचा तूर्तास मानस असून, त्याच दृष्टीने मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. यानुषंगाने शुक्रवारी मुंबईत झालेल्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाळापूर व अकोला पश्चिम या दोन मतदारसंघांबाबत आग्रही भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, गुलाबराव गावंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी जिल्ह्याचे चित्र मांडले, तर महानगर अध्यक्ष राजकुमार मुलचंदाणी यांनी अकोला शहरातील स्थितीची माहिती दिली.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघ काँग्रेसला तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवारी देण्यात आली होती. २०१४ मध्ये आघाडीतील हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे २०१९ साठी जागा वाटपाचा निकष ठरविताना २००९ च्या जागा वाटपाचे सूत्र समोर ठेवत राष्ट्रवादीकाँग्रेसने दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. अकोला पश्चिम हा मुस्लीमबहुल मतदारसंघ असून, येथे गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक दोनवर होता. त्यामुळे हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे कायम ठेवत मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी शहरातील मुस्लीम नेत्यांनी रेटून धरली. दुसरीकडे काँग्रेसकडे असलेला बाळापूर हा मतदारसंघ राष्टÑवादीला मिळावा, असा आग्रह नेत्यांनी धरला. अकोला पश्चिममध्ये राष्ट्रवादीने मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी दिली, तर त्याचा फायदा बाळापूर या मुस्लीमबहुल मतदारसंघात दुसऱ्या उमेदवाराला होऊ शकतो, असा कयास बांधल्या जात आहे. बाळापुरातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हेच उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने अकोला पश्चिम आपल्याकडे ठेवून बाळापूरही मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आघाडीच्या संयुक्त बैठकीत कस लागणार आहे. याबैठकीला राष्ट्रवादीचे नेते संतोष कोरपे, श्रीकांत पीसे पाटील, विजय देशमुख, रफीक सिद्दीकी, राजु बोचे, आदी उपस्थित होते.

अकोला पश्चिम केंद्रबिंदूकाँग्रेसला बाळापूर, अकोला पश्चिम व अकोट हे तीन मतदारसंघ हवे असून, राष्ट्रवादीची अकोला पूर्व व मूर्तिजापूर या दोन मतदारसंघांवर बोळवण करण्याची रणनीती आहे. काँग्रेसच्या बैठकीत तशी मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे अकोला पश्चिम या मतदारसंघाबाबत आघाडीत रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात क्रमांक दोनची मते घेणारे राष्ट्रवादीचे विजय देशमुख, रफीक सिद्दीकी, जावेद जकेरिया यांनाही उमेदवारी हवी आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAkolaअकोला