शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील युवा गजलकार नईम फराजची झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:06 IST

अकोला : अकोल्यातील युवा गजलकार नईम फराज यांना आला आहे. जुने शहरातील अगरवेसजवळ राहणारे, मध्यमवर्गीय कुटुंबीयातील मोहम्मद हाशम यांचे सुपुत्र असलेल्या नईमची दखल थेट भारतीय दूतावासाने घेतली असून, त्यांना चार दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर आमंत्रित केले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अकोल्यातील युवकाच्या प्रगतीचा आलेख अनेकांसाठी प्ररेणादायी आहे. 

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील युवा गजलकार नईम फराज यांना आला आहे. जुने शहरातील अगरवेसजवळ राहणारे, मध्यमवर्गीय कुटुंबीयातील मोहम्मद हाशम यांचे सुपुत्र असलेल्या नईमची दखल थेट भारतीय दूतावासाने घेतली असून, त्यांना चार दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर आमंत्रित केले आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अकोल्यातील युवकाच्या प्रगतीचा आलेख अनेकांसाठी प्ररेणादायी आहे.  अकोला महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक १0 मध्ये शिक्षण घेऊन नईमने स्वत:ला घडविले. जमा, वहिद सारखे गुरुवर्य भेटल्याने नईमला जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची सवय लागली. या सवयीनेच पुढे त्याला मोठे शायर म्हणून नावारूपास आणले आहे. त्यानंतर उस्मान आझाद हायस्कूलमध्ये फसीउल्ल नकीब, कलाम, सईद खॉ या सुप्रसिद्ध साहित्यकारांसारख्या गुरुजनांचा सहवास लाभला. पुढे शहाबाबू हायस्कूलमधील ईसहाक राही, शमशेर खान आणि कुटुंबीयातील अँड. र्मदान अली, अल्मतश शम्स यांच्याकडून नईमला वेगळी दिशा मिळाली. सामाजिक भान जोपासत सुरू केलेल्या काव्य, गजल शेरांमुळे नईम फराज अल्पावधीतच अकोल्यातून मुंबई, दिल्ली आणि देशाबाहेरच्या थोरा- मोठय़ांच्या पंगतीत जाऊन बसला. त्याचीच पावती म्हणून आता नईम रियाध, जुबैल, दम्माम, जद्दाह या अरेबियांतील चार ठिकाणी मुशायरासाठी  जात आहे. भारतीय दूतावासाने या आधी देखील घेतलेल्या या मुशायर्‍यात  हा युवक दोहा, कतर, दुबई येथील मैफीली गाजवून आला आहे. अकोल्यातील युवा गजलकार नईम फराजचा ‘शेर’ याआधी दिल्लीच्या संसदेतदेखील गाजला  आहे. ३७ वर्षीय युवा गजलकाराने घेतलेली ही झेप साहित्यक्षेत्रात करीअर घडवण्यास इच्छुक असलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहर