शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नवरात्रोत्सवापूर्वीच कर्जमुक्तीचा शेतकर्‍यांना लाभ द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून,  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्‍यांना  रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार  कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्‍यांची  बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती  करण्याच्या नावाखाली शेतकरी बांधवांना शासकीय  कार्यालयांचे हेलपाटे घ्यावे लागत आहेत. नवरात्र उत्सवा पूर्वी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे तातडीने निवारण  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या; अन्यथा गंभीर  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आला. 

ठळक मुद्देशिवसेनेचा जिल्हाधिकार्‍यांना इशारासेनेच्या मोर्चाने दणाणले शहर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून,  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्‍यांना  रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार  कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्‍यांची  बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती  करण्याच्या नावाखाली शेतकरी बांधवांना शासकीय  कार्यालयांचे हेलपाटे घ्यावे लागत आहेत. नवरात्र उत्सवा पूर्वी शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांचे तातडीने निवारण  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्या; अन्यथा गंभीर  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेच्यावतीने  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आला.  कर्जमाफीच्या नावाखाली भाजपाने शेतकर्‍यांच्या भावनांशी  खेळ चालवला आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे  अर्ज सादर करण्याचा निकष शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरत  आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे त्यात  अधिकच भर पडल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख  नितीन देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला. रेल्वे स्टेशन रोडवरील जिजाऊ  हॉल येथून  मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोर्चात शिवसेना  आ. गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर,  जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, मा.आ. संजय गावंडे, उ पजिल्हाप्रमुख बंडू ढोरे, गोपाल दातकर, दिलीप बोचे, रवींद्र  पोहरे, मुकेश मुरूमकार, महादेवराव गवळे, डॉ. दीपक  केळकर, शहरप्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, प्रदीप  गुरुखुद्दे, तालुकाप्रमुख विकास पागृत, विजय माहोड, संजय  शेळके, अप्पू तिडके, गजानन मानतकर, रवी मुर्तडकर,  श्याम गावंडे, बळीराम कपले, आनंद बनचरे, विनायक  गुल्हाने, हरिभाऊ भालतिलक, विनीत पाटील भौरदकर,  सुभाष धनोकार, नगरसेवक गजानन चव्हाण, संतोष  अनासने, सर्कलप्रमुख दिनेश सरोदे, उपशहर प्रमुख  अभिषेक खरसाडे, योगेश गीते, अश्‍विन नवले, राहुल  कराळे, दिनू सुरोसे, तरुण बगेरे, गजानन बोराळे, शहरप्रमुख  विक्रांत शिंदे, सुनील रंधे, आनंद बनचरे, प्रवीण इंगळे, स तीश मानकर, अविनाश मोरे,अजय देशमुख, डॉ.राजेंद्र शर्मा,  संजय वाडेकर आदींसह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले  होते. 

काय म्हणाले पदाधिकारी?जिल्हाधिकार्‍यांसोबत आ.गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क  प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, मा.आ.  संजय गावंडे यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील किती  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, ऑनलाइन प्रक्रिये त तांत्रिक अडचणी येत असताना त्या दूर करण्यासाठी  पर्यायी व्यवस्थेची उभारणी का केली नाही, असा सवाल  आ.बाजोरिया यांनी उपस्थित केला. अर्ज सादर करताना शे तकर्‍यांना त्रास होत असून, सेतू केंद्र चालकांकडून आर्थिक  लूट केली जात असल्याचे नितीन देशमुख यांनी नमूद केले.  या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले  जात असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  सांगितले. यावेळी सविता वाकोडे, सुनीता मेटांगे, ज्योत्स्ना  चोरे, देवश्री ठाकरे उपस्थित होत्या.

मुस्लीम बांधवांचा मोठा सहभागकर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेने काढलेल्या मोर्चात जिल्ह्या तील शेतकर्‍यांसह मुस्लीम बांधवांची उपस्थिती लक्षणीय हो ती. खांद्यावर भगवे ध्वज घेऊन मुस्लीम तरुण मोर्चात  सहभागी झाले होते. 

बैलगाड्यातून पोहोचले पदाधिकारी!शेतकर्‍यांसाठी काढलेल्या मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी  बैलगाड्यांमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.  गोरेगाव येथील सविता वाकोडे यांच्यासह असंख्य महिला  मोर्चात सहभागी होत्या. बैलगाड्यातून वाकोडे यांच्यासह  माजी नगरसेविका राजेश्‍वरी शर्मा व इतर महिलांनी  जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.