शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची करणी...कुपनलिकेतून वाहतेय भरभरून पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:01 IST

कुपनलिकेतून (बोअरवेल) मधून मोटारपंपशिवाय पाणी ओसंडून वाहत आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : निसगार्ची कृपा झाली तर काय होईल सांगता येत नाही. अशीच कृपा तालुक्यातील निंबा येथील शेतकऱ्यावर झाली असून, ८ वर्षांपूवी शेतात खोदलेल्या कुपनलिकेतून (बोअरवेल) मधून मोटारपंपशिवाय पाणी ओसंडून वाहत आहे.तालुक्यातील निंबा येथील शेतकरी दिपक फुके यांनी शेती सिंचनासाठी आपल्या एक हेक्टर शेतात आठ वर्षांपूर्वी तीनशे फुट बोअर केल. शस बोअरला अडीचशे फुट अंतरावर भरपूर पाणी लागले. त्यात त्यांनी ७ हॉर्सपावरचे मोटारपंप बसविले. तेव्हा पासून आपल्या शेतीचे सिंचन करुन इतर लोकांच्या शेतीता पाणी पुरवठा करुन त्यांच्या शेतीचीही सिंचन व्यवस्था केली आहे. गावापासून केवळ ३०० मिटर अंतरावर शेती असल्याने २०१५ साली गावात प्रचंड दुष्काळ पडला असता संपूर्ण गावाला याच बोअर मधून पाणी पुरवठा करण्यात आला असल्याचे दिपक फुके यांनी लोकमतशी बोलताना सांगितल. दरम्यान, या वर्षी निंबा परिसरात भरपूर प्रमाणात पाऊस झाला असून, गत २४ तासात या गावात ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात आतापर्यंत ४२०.६ मिलीमीटर (५६.६३ टक्के ) एवढे पर्जन्यमान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी दिपक फुके शेतात गेले असता शेतातील कुपनलिकेतून पाणी ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज नसताना ओसंडून वाहणारे पाणी पिकात सोडावे लागत आहे. यापूर्वी ७ हॉर्सपावरच्या मोटारपंपने त्यांनी संपूर्ण बोअरमधले पाणी बाहेर काढून उपसा परण्याचाही प्रयत्न केला असता २४ तासानंतर ही पाण्याची पातळी उन्हाळ्यातही कमी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.८ वर्षांपूर्वी शेतात बोअरवेल केले त्यावेळी २५० फुट अंतरावर भरपूर पाणी लागले. तेव्हा पासून आजपर्यंत बोअरमधून पाणी ओसंडून जाण्याचा प्रकार कधीच झाला नाही. यावर्षी मात्र पहिल्यांदाच बोअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे.दिपक फुकेशेतकरी, निंबा, ता. मूर्तिजापूरलोकांच्या मते हा नैसर्गिक चमत्कार असला तरी असला प्रकार नाही. हा प्रकार सर्वसाधारण आहे. कुठेतरी या बोअरला लांब मोठ्या जल प्रवाहाची कनेक्टिव्हिटी आहे. त्या शिवाय हे होणे शक्य नाही. बहूदा जमीनीखाली मोठा जलसाठा असतो. यामुळे तसे होते. काही वेळाने ओसंडून वाहणारे पाणी बंद होते.- उल्हास बंडभूवैज्ञानिक, भूजल विकास सर्वेक्षण यंत्रणा, उपसंचालक कार्यालय अमरावती

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर