शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपाकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा कानाडोळा!

By admin | Updated: July 3, 2014 01:41 IST

अकोला जिल्ह्यात २५७ कोटींपैकी केवळ ७२ कोटींचे केले कर्ज वाटप

संतोष येलकर / अकोलाअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांना २५७ कोटी ६९ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ७२ कोटी ८३ लाखाचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पाऊस दडी मारून बसल्याने, जिल्हय़ात दुष्काळाचे सावट असल्याच्या स्थितीत शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाच्या कामाकडे राष्ट्रीयीकृत बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे चित्र समोर येत आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक, १७ राष्ट्रीयीकृत बँकांसह व्यापारी बँकांमिळून जिल्हय़ातील शेतकर्‍यांना एकूण ७१९ कोटी ३६ लाख पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. त्यानुसार संबंधित बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटपाची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. त्यामध्ये गत मे महिन्याअखेर एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत ४१७ कोटी ७९ लाखांचे पीक कर्ज वाटप बँकांमार्फत करण्यात आले. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत ३0२ कोटी २३ लाख, ग्रामीण बँक ४0 कोटी, व्यापारी बँका २ कोटी ७३ लाख आणि १७ राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत केवळ ७२ कोटी ८३ लाखांचे पीक कर्ज वाटपाचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक, इको बँक, बँक ऑफ इंडिया व इतर बँकांसह एकूण १७ राष्ट्रीयीकृत बँकांना खरिप हंगामात २५७ कोटी ६९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी, मे अखेर या बँकांमार्फत केवळ ७२ कोटी ८३ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आल्याची स्थिती आहे.पावसाळा सुरू होऊन महिना उलटून जात आहे; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्हय़ात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून,जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असतानाच शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाच्या कामाकडे मात्र जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे.कर्ज वाटपाची गती वाढविण्याचे निर्देश देणार!खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे बँकांना देण्यात आलेले उद्दिष्ट आणि त्या तुलनेत वाटप करण्यात आलेले पीक कर्ज यासंदर्भात लवकरच राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्वच बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे. पीक कर्ज वाटपाच्या कामाची गती वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात येणार आहेत. -अरुण शिंदे, जिल्हाधिकारी