शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

राष्ट्रीय कीर्तनकार आमले महाराज अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:58 IST

गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला.

ठळक मुद्देगुरुदेव सेवकांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप शेकडो नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य  वेचणारे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिला. आदरणीय आमले महाराज यांना अखेरचा निरोप देताना गुरुदेवभक्तांना गहिवरून आले होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वसा घेतलेल्या आमले महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर गुरुदेव भक्त व अकोलेकरांनी शुक्रवारी सकाळपासूनच त्यांच्या न्यू खेतान नगर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी या ठिकाणी श्रद्धांजली सभेत गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शब्दसुमने अर्पित केली. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. न्यू खेतान नगर भागातून त्यांची अंतिमयात्रा काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गुरुदेवभक्त उपस्थित होते. न्यू खेतान नगर मोक्षधाम येथे शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सत्यपाल महाराज, जनार्धन बोथे, डॉ. उद्धव गाडेकर, गुलाबराव महाराज, बलदेवराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, अँड. संतोष भोरे, रामेश्‍वर बरगट, डॉ. गजानन नारे, नीरज आवंडेकर, महादेवराव भुईभार, डॉ. अशोक ओळंबे, सावळे गुरुजी, शिवाजी म्हैसने, सोळंके गुरुजी, बालमुकुंद भिरड, प्रचारक ज्ञानेश्‍वर रक्षक, भानुदास कराळे, मनोहरदादा रेचे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व गुरुदेव भक्त उपस्थित होते. नागपूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आदी जिल्हय़ांमधून गुरुदेव सेवक अंत्यविधीला उपस्थित होते.

शब्दसुमनांची श्रद्धांजलीमोक्षधाम येथे राष्ट्रसंतांच्या अनुयायांनी आमले महाराज यांना शब्दसुमनांची श्रद्धांजली अर्पण केली. कीर्तनकार उद्धवराव गाडेकर, ज्ञानेश्‍वर रक्षक, मनोहरदादा रेचे, प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, सावळे गुरुजी, सोळंके गुरुजी, बालमुकुंद भिरड यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर