शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात -  नितीन गडकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:27 IST

येत्या काही दिवसांतच महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अकोला: मुंबई ते कोलकाता राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचा कंत्राट ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ कंपनीला दिला होता. कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे महामार्गाच्या दुुरुस्तीचे काम प्रभावित झाले होते. काम रखडल्याने कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात येऊन नव्याने निविदा काढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वाडेगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते.२०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येताच दळणवळणाच्या सुविधेसाठी संपूर्ण देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम हाती घेण्यात आले. ही बाब विरोधकही खासगीत मान्य करतात. देशभरातील मोठ्या शहरांना जोडण्याच्या उद्देशातूनच मुंबई ते थेट क ोलकातापर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्याचा कंत्राट ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ कंपनीला देण्यात आला होता; परंतु ही कंपनी डबघाईस आल्याने कंपनीसोबतचा कंत्राट रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. याव्यतिरिक्त अकोला, वाशिम, हिंगोली ते नांदेडपर्यंत १७२ किमी रस्ता दुरुस्तीसाठी अडीच हजार कोटींची निविदा निघाली आहे. येत्या दीड-दोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले.६५ वर्षांत कोणाची गरिबी हटविली?देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गरिबी हटविण्याचा नारा दिला होता. त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरू यांचे पणतू राहुल गांधी यांनीसुद्धा गरिबी हटविण्याचा नारा दिला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ग्रामपंचायतपासून ते केंद्रापर्यंत ६५ वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतरही काँग्रेसकडून गरिबी हटविण्याचा नारा दिला जातो, ही शोकांतिका असल्याची टीका नितीन गडकरी यांनी केली.विरोधकांना जोरदार ‘करंट’ लागेल!देशात पुन्हा एकदा स्थिर सरकार स्थानापन्न होईल. त्या दिवशी काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीला जोरदार करंट लागेल, असा मार्मिक टोला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लगावला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरीNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6akola-pcअकोला