शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पारस औष्णिक विजनिर्मिती केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:02 IST

अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

अकोला : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लक्षात घेऊन वीज उत्पादन प्रक्रियेत जल संवर्धन विषयक जाणीवेतून काटकसरीने पाणी वापर, पाण्याचा पुनर्वापर,शून्य पाणी निचरा इत्यादीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी ५०० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.नवी दिल्ली येथे मिशन एनर्जी फाउंडेशन या संस्थेच्यावतीने पार पडलेल्या ‘जलसंवर्धन २०१९’ या परिषदेत हा पुरस्कार भारत सरकारचे माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान आणि मिशन एनर्जी फाउंडेशनचे संचालक अश्विनकुमार खत्री यांचे हस्ते पारस वीज केंद्राचे कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा तुपसागर यांना प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार लक्षणीय आहे कारण या संबंधीची आकडेवारी परस्पर केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांचेकडून घेण्यात आलेली आहे व मान्यवर परीक्षकांच्या शिफारशीनुसार या उल्लेखनीय कामाची निवड करण्यात आलेली आहे. देशभरातील बहुतांश सार्वजनिक, शासकीय व खाजगी वीज केंद्रांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. विशेषत: नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशनसारख्या अग्रमानांकित संस्थेचा यामध्ये सहभाग होता.पारस औष्णिक विद्युत केंद्राने पाणी वापर शासकीय निकष ३.५ लिटर प्रति युनिट असतांना मागील दोन वर्षात सूक्ष्म नियोजन करून सन २०१६-१७ (३.०७), २०१७-१८ (२.९३) आणि २०१८-१९ (२.५६) लिटर प्रति युनिट अशी सातत्याने पाणी काटकसर केलेली आहे. पाण्याचा पुनर्वापर केल्याने हि किमया साधता आली. विशेष म्हणजे, राख वाहून नेणारे पाणी, वसाहतीमधील सांडपाणी, वीज उत्पादन प्रक्रियेनंतर बाहेर निघणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून, त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला व त्यामूळे पारस वीज केंद्राला कार्यक्षम पाणी वापर वीज केंद्र या संवर्गात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

पारस वीज केंद्राचे अधिकारी-विभाग प्रमुख-अभियंता-तंत्रज्ञ-कर्मचारी व रहिवाश्यांनी पाणी बचतीसाठी व पुनर्वापरासाठी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित असल्याचे मुख्य अभियंताडॉ.रवींद्र गोहणे यांनी सांगितले.मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील कायार्साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

टॅग्स :Paras Thermal Power Stationपारस औष्णिक विद्युत केंद्रAkolaअकोला