शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद ‘आरओबी’ ठरतोय शिवर-रिधोरा चौपदरीकरणात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:09 IST

शिवर ते रिधोरा मार्गाच्या चौपदरीकरणात महाबीज कार्यालयाजवळील अरुंद आकाराचा रेल्वे ओव्हर ब्रीज अडसर ठरत आहे.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवर ते रिधोरा मार्गाच्या चौपदरीकरणात महाबीज कार्यालयाजवळील अरुंद आकाराचा रेल्वे ओव्हर ब्रीज अडसर ठरत आहे. दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने ओव्हर ब्रीजच्या खालील भागात ६० मीटरचा स्पॅन सोडण्याची अट घातली आहे; मात्र ही अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास मान्य नाही. प्रशासनाच्या तांत्रिक पेचामुळे गत एक वर्षापासून या मार्गाचे चौपदरीकरण थांबले होते. अजूनही त्यावर ठोस पर्याय न निघाल्याने अरुंद आरओबी चौपदरीकरणात अडसर ठरत आहे.शिवर ते रिधोरा या जुन्या मिनी बायपासच्या चौपदरीकरणास प्रारंभ होत असून, या मार्गावरील ४८२ वृक्षतोडीला महसूल विभागाने परवानगी दिली आहे. औरंगाबादच्या कंपनीने १३६ कोटींत सिमेंट काँक्रिटच्या चौपदरीच्या निर्माणाचे कंत्राट घेतले आहे. शिवरपासून रिधारोकडे जात असलेल्या या चौपदरीकरणात महाबीजजवळ जुना रेल्वे ओव्हर ब्रीज येतो.अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर असलेला आरओबी ६० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. जर या मार्गाचे चौपदरीकरण करायचे असेल, तर या आरओबीचा विस्तार करणे क्रमप्राप्त आहे; मात्र दक्षिण-मध्य रेल्वेने घातलेली अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास शक्य नाही. जर तसे केले तर यातील मोठी रक्कम केवळ आरओबीच्या विस्तारीकरणावर खर्च होईल. केंद्र सरकारने एकतर चौपदरीकरणासाठी अतिरिक्त निधी द्यावा किंवा दक्षिण-मध्य रेल्वेने घातलेली अट शिथिल करावी, अशा आशयाचा प्रस्तावही राष्ट्रीय प्राधिकरणाने केंद्राकडे पाठविला आहे.

३०-३५ मीटरच्या स्पॅनला प्राधिकरणाची संमती६० वर्षांपूर्वी महाबीजजवळ बांधलेले आरओबी ९ मीटर रुंद आहे. त्यालगत नवा आरओबी उभारण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे; मात्र त्यासाठी पुलाखाली ६० मीटर रुंदीचा स्पॅन सोडणे महामार्ग प्राधिकरणास महागात पडणार आहे. प्राधिकरणाने ३० ते ३५ मीटर रुंदीच्या आरओबीची तयारी दर्शविली आहे; मात्र ६० मीटरचा मोठा स्पॅन सोडणे प्राधिकरणाला शक्य नाही, असेही सूत्रांनी सांगितले आहे.चौपदरीकरणाआधी महाबीजच्या आरओबीचा विस्तार करणे गरजेचे आहे. दक्षिण-मध्य रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वयाने यातून मार्ग काढावा, अन्यथा शहरातील आरओबीजवळ बॉटलनेक झाल्याशिवाय राहणार नाही.-अशोक डालमिया, राष्ट्रीय सचिव,कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन.

टॅग्स :Akolaअकोलाroad transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग