शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेसचं दर आठवड्याचं रडगाणं; सुरत, बिकानेरला जाणारे प्रवासी त्रस्त

By atul.jaiswal | Updated: September 12, 2022 12:46 IST

नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नांदेड येथे पोहोचते.

अकोला : अकोल्यासह वाशिम, हिंगोली जिल्ह्यांतील प्रवाशांना सुरत, अहमदाबाद, बिकानेरमार्गे थेट राजस्थानमध्ये घेऊन जाणारी नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गत अनेक आठवड्यांपासून प्रस्थान स्थानकावरूनच पाच ते सहा तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या रेल्वेगाडीच्या रेकचा वापर नांदेड-तिरूपती एक्स्प्रेसकरिता होत असल्याने दर आठवड्याला ही गाडी गंतव्यस्थळी सहा ते आठ तास उशिरा पोहोचत आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर व महाराष्ट्रातील नांदेड या दोन स्थानकांदरम्यान १७६२३/१७६२४ नांदेड-श्रीगंगानगर-नांदेड ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी धावते. विदर्भातील अकोला, वाशिमसह मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील प्रवासी व व्यापाऱ्यांना थेट सुरत, अहमदाबाद, बिकानेर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी सोयीस्कर असल्याने ही गाडी लोकप्रिय ठरली आहे. 

नांदेड येथून दर गुरुवारी सकाळी ६.५० वाजता निघणारी ही गाडी सकाळी ११.५० वाजता अकोल्यात येऊन पुढे भुसावळमार्गे श्रीगंगानगरला रवाना होते. परतीच्या प्रवासात शनिवारी सुटणारी ही गाडी रविवारी रात्री २१.२० वाजता अकोल्यात आल्यानंतर सोमवारी पहाटे २.३० वाजता नांदेड येथे पोहोचते. त्यानंतर गुरुवारपर्यंत ही गाडी नांदेड येथे यार्डात उभी राहत असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेने या गाडीच्या रेकचा वापर ०७६४१/०७६४२ नांदेड-तिरूपती-नांदेड एक्स्प्रेससाठी सुरू केला. सोमवारी रात्री नांदेड येथून तिरूपतीला निघणारी ही गाडी मंगळवारी रात्री गंतव्यस्थळी पोहोचते. 

परतीच्या प्रवासात मंगळवारी रात्री ११.५० ला निघणारी ही गाडी बुधवारी रात्री ११.४५ वाजता पोहोचते. तथापि, परळी व लातूर येथे दोन वेळा इंजिन मागे-पुढे करणे व विशेष गाडी असल्यामुळे नियमित गाड्या आधी जाऊ द्याव्या लागत असल्यामुळे या गाडीला नांदेड येथे पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे रेकच्या मेंटेनन्सला पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी गत काही आठवड्यांपासून नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसला गुरुवारी पहाटे ६.५० या निश्चित वेळेत रवाना करणे शक्य होत नाही.

व्यापाऱ्यांची होत आहे गैरसोयपूर्णा, वसमत, हिंगोली, पुसद, वाशिम, रिसोड, अकोला येथील शेकडो व्यापारी सुरत, अहमदाबाद, वडोदरा, बिकानेर या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शहरांमध्ये व्यवसायानिमित्त जाण्यासाठी नांदेड-श्रीगंगानर एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. परंतु, गत काही आठवड्यांपासून ही गाडी उशिरा सुटत असल्यामुळे सुरत येथे मध्यरात्री पोहोचत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना रात्रीच्या वेळी भटकंती करावी लागत आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोलाpassengerप्रवासी