शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इमारतींना नियमानुकूल करण्यासाठी राज्यात नांदेड पॅटर्नचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:22 IST

बांधकाम व्यवसायाची वर्तमान स्थिती लक्षात घेता राज्यात नांदेड पॅटर्नच्या धर्तीवर इमारतींना नियमानुकूल केल्या जात असल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात डिसेंबर २०१५ पूर्वी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगच्या नियमावलीमधील काही निक ष मुंबई हायकोर्टाने रद्दबातल ठरवले आहेत. या नियमावलीवर संभ्रमाची स्थिती कायम असून, बांधकाम व्यवसायाची वर्तमान स्थिती लक्षात घेता राज्यात नांदेड पॅटर्नच्या धर्तीवर इमारतींना नियमानुकूल केल्या जात असल्याची माहिती आहे.राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी उभारण्यात आलेल्या व नियमापेक्षा जास्त बांधकाम झालेल्या इमारतींवर कारवाई न करता त्या अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. अशा इमारतींना अधिकृत करण्यासाठी शासनाने ७ आॅक्टोबर २०१७ रोजी हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंगची नियमावली लागू केली, तसेच मालमत्ताधारकांना मनपामध्ये प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली; परंतु हार्डशिपचे दर ‘ड’वर्ग महापालिकांना परवडणारे नसल्याचे समोर आल्यानंतर नगर विकास विभागाने फेरविचार करीत हार्डशिपचे दर निश्चित करण्याचे अधिकार महापालिकांना सोपविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात शासन अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या तयारीत होते. या दरम्यान मुंबई हायकोर्टात सात याचिकाकर्त्यांनी हार्डशिपच्या नियमावलीवर आक्षेप नोंदवला असता, न्यायालयाने ही नियमावली रद्द करण्याचा आदेश नोव्हेंबर महिन्यात जारी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाला शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यास स्थगिती मिळण्याची अपेक्षा होती. या मुद्यावर संभ्रमाची स्थिती कायम असून, बांधकाम व्यवसायाची वर्तमान स्थिती लक्षात घेता आज रोजी नांदेड पॅटर्नचा नागपूर, पुणे, कोल्हापूर आदींसह इतरही महापालिकांमध्ये आधार घेऊन इमारतींना नियमानुकूल करण्याची प्रक्रिया केली जात आहे.काय आहे नांदेड पॅटर्न?नियमापेक्षा जास्त बांधकाम केलेल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता त्यांच्यावर एकरकमी दंडात्मक कारवाईसाठी राज्यात सर्वप्रथम नांदेड महापालिके ने ‘स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण’(डीसीआर)नियमावली तयार केली. मनपाच्या सभागृहाने दंडाची रक्कम निश्चित केल्यावर या नियमावली अंतर्गत इमारतींवर कारवाई करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाGovernmentसरकार