लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात जुलैच्या पहिल्या दिवसापासून (वस्तू व सेवा कर) जीएसटी अंमलबजावणी होत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे पूर्वीच्या विक्रीकर खात्याचे नाव यापुढे जीएसटी (वस्तू व सेवा कर) राहणार आहे. विक्रीकर कार्यालयाचे नामांतरण आता जीएसटीत होत असल्याचे सर्वत्र नामकरण सोहळे होणार आहे. अकोल्यातही उपायुक्त सुरेश शेंडगे यांच्या पुढाकारात शनिवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वाशिम बायपास मार्गावरील निमवाडीजवळ गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात विक्रीकर कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाचे नाव शुक्रवारी रात्रीच खोडून त्यावर वस्तू व सेवा कर लिहिले गेले. महाराष्ट्रासह अकोल्यातील विक्रीकर कार्यालय शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून इतिहास जमा होत आहे. शनिवारी सकाळी जीएसटीच्या हॉलमध्ये व्यापारी, उद्योजक, सीए यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. अधिकृतपणे जीएसटी कार्यालयाचे उद्घाटन केल्या जाणार आहे. त्याची तयारी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत येथे सुरू होती. ज्या व्यापारी-उद्योजकांना जीएसटीसंदर्भात अजूनही काही अडचणी असतील, त्यांच्यासाठी हेल्प डेस्कची सेवा येथे करण्यात आली आहे. या ठिकाणी समाधान करण्यासाठी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.आश्वासनानंतर अधिकाऱ्यांचे आंदोलन मागेजीएसटी लागू होण्याच्या १ जुलैपासूनच राज्याच्या (पूर्वीच्या विक्रीकर) अधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. जर अधिकारी संपावर गेले, तर त्यांना निलंबित करण्यात येईल, असा इशारा मंत्रालयाने दिला. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या संघटनेवर दबाव आला. दरम्यान, समन्वय बैठकीत राज्यकर्त्यांकडून आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेतले गेले आहे. ‘जीएसटी’साठी एेंशी टक्के नोंदणी व्हॅटच्या तुलनेत अकोल्यातील पूर्वीची जीएसटीची नोंदणी घसरलेली होती. सर्व्हर डाउन असल्याने ही नोंदणी पूर्ण झाली नव्हती; मात्र २५ जूनपासून सुरू झालेल्या नोंदणीत अकोल्याने ८० टक्क्यांच्या पुढे आकडा पार केला आहे. त्यामुळे जीएसटीच्या माध्यमातून अकोल्याचा निधी वाढणार असल्याचे संकेत आहेत.
‘जीएसटी’चा नामकरण सोहळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 01:11 IST