शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ प्रणालीमध्ये नाव नसल्याने, शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:50 IST

प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देशिक्षण संचालकांकडे तक्रार कुटुंबावर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे दोन शिक्षकांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. येथील क्रांतिज्योती मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक अमोल रामदास मडावी व संजय भीमराव धोत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात न आल्यामुळे त्यांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव शाळेने २६ ऑक्टोबर २0१६ रोजी अधीक्षक वेतन पथक यांच्याकडे सादर केला होता. परंतु, त्यात काही त्रुटी होती. त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त त्रुटींची पूर्ततादेखील केली; परंतु त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. या दोन्ही शिक्षकांनी वारंवार शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत प्रयत्न केले. त्रुटीसुद्धा दूर केल्या; परंतु त्यानंतरही जाणीवपूर्वक शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करण्यात येत नसल्याने, त्यांचा गत दहा महिन्यांपासून पगार रखडला आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.दिवाळीपूर्वी त्यांना त्यांचे नियमित व थकीत वेतन न मिळाल्यास आत्मदहन करू, असा इशारा  शिक्षक अमोल मडावी व संजय धोत्रे यांनी दिला आहे. या शिक्षकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांकडेसुद्धा तक्रारी केल्या आहेत.