शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:38 IST

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्दे शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे.याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोला : मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली. त्यांनी मुंबईतील घाटकोपर भागात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक सरकार उभारणा असल्याचेही सांगितले.मुंबई विद्यापीठाला मॉ जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली असून, त्यांनतर लगेचच शुक्रवार,१५जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. यासंदर्भात नामातंराच्या नव्या वादाला ही सुरू वात समजायची का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता मुंबई विद्यापिठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची आमची जुनीच मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्रचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी बुलंद केला. कामगार,कष्टकरी,समतावादी चळवळ उभी केली. भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबध त्यांनी दृढ केले. त्यांच्या अजरामर साहित्याने समाज जागृती केली,या भूमीपुत्राचे नाव मुंबई विद्यापीठाला दिल्यास विद्यापीठाचा गौरव वाढणारा आहे. म्हणून ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा वादाचा विषयच नसल्यसाचे त्यांनी अधोरेखित केले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय  ग्रंथालय,राष्ट्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची विद्यार्थ्यांना पूर्व तयार करता यावी म्हणून, निवासी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल.वातानुकूलीत सभागृह, मुला-मुलीचे वसतीगृही येथे असेल. याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी आरक्षण अनुसूचित जातीतील एकाच मोठ्या वर्गाला मिळाले असल्याचा आरोप करीत आरक्षणाचे वर्गीकरण करू न अनुसचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत हे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीची मागणी अनेकवर्षापासून करतो आहे. याकरिता अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असावे, यासाठीचा आमचा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असल्याने त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हयात दलित (मांतग)समाजाच्या मुलांनी विहिरीत आंघोळ केली म्हणून मारहाण करण्यात आली.

दलितावरील अत्याचार आणि सरकारचा संबध नाही 

दलितावरील अन्यायाचे प्रकार या सरकारमध्ये वाढले आहेत, या प्रश्नावर बोलताना त्यांनी अन्याय अत्याचार आणि सरकारचा यात काहीच संबध नसल्याचे सांगत, दलितावरील अत्याचर हजारोवर्षापासून सुरू आहेत. याचा सरकारशी संबध नसतो, यापुर्वीच्या सरकारमध्येही अत्याचार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMumbai Universityमुंबई विद्यापीठ