शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्राप्तिकर अधिकार्‍यांनी ठोकला अकोल्यात तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 02:01 IST

अकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यावरून नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने अकोल्यातील आहुजा-मोटवाणी परिवाराच्या ग्रुपवर सुरू केलेली सर्च मोहीम शुक्रवारीदेखील काही प्रतिष्ठानांवर सुरूच राहिली. धाड टाकणार्‍या पथकातील काही अधिकारी गेले असले, तरी यातील प्रमुख अधिकारी मात्र अजूनही अकोल्यात तळ ठोकून आहेत.

ठळक मुद्देआहुजा-मोटवाणी यांच्या प्रतिष्ठानांवर शुक्रवारीदेखील सर्च मोहीम सुरूच राहिलीधाड टाकणार्‍या पथकातील अधिकारी अजूनही अकोल्यात तळ ठोकून आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यावरून नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने अकोल्यातील आहुजा-मोटवाणी परिवाराच्या ग्रुपवर सुरू केलेली सर्च मोहीम शुक्रवारीदेखील काही प्रतिष्ठानांवर सुरूच राहिली. धाड टाकणार्‍या पथकातील काही अधिकारी गेले असले, तरी यातील प्रमुख अधिकारी मात्र अजूनही अकोल्यात तळ ठोकून आहेत.प्राप्तिकर विभागातील अधिकार्‍यांची कारवाई अत्यंत गोपनीय असून, अकोल्यातील अधिकार्‍यांनाही काही बाबी सांगण्यास ते टाळत आहेत. दोन्ही परिवारातील घरातील दागिने, त्यांच्या बँक खात्यातील रकमा, बँक लॉकर्स, झालेली मोठी उलाढालची चाचपणी अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आणखी काही दिवस प्राप्तिकर विभागाचे अधिकारी अकोल्यात थांबणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी दोन्ही प्रतिष्ठानांच्या नावाने आणि भाड्याने घेतलेल्या गोडावूनची झाडाझडती घेतली. नागपूर प्राप्तिकर विभागाचे डीआय जयराज काजला यांना अकोल्यात होत असलेल्या प्रत्येक कारवाईची माहिती पाठविली जात असून, त्यांच्या निर्देशान्वये सूत्र हलविले जात आहेत. त्यानुसार सहायक डीआय एस.पी.जी. मुदलीयार पुढील कारवाई करीत आहेत. आहुजा-मोटवाणी परिवारातील सदस्याचे स्त्री धन आणि कायदेशीर दागिने सोडून, इतर दागिने जप्त करण्यात आले आहेत. बँकेतील रकमांच्या नोंदी आणि आक्षेपार्ह वाटणार्‍या नोंदीचे दस्तऐवजही प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आहुजा-मोटवाणी ग्रुपच्या अनेक प्रतिष्ठानांवर दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात आला. यातील काही प्रतिष्ठान शुक्रवारी बंद होते. हळदी-बेसनच्या व्यावसायापासून तर आजपर्यंतच्या आर्थिक व्यवहार तपासण्याचे कार्य प्राप्तिकर विभागाचे अधिकारी करीत आहेत. संपत्तीचे डिक्लेरेशन आणि दंडाबाबतची माहिती जाहीर केली जाण्याचे संकेत आहेत.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरIncome Taxइन्कम टॅक्स