शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मडगाव-नागपूर एक्स्प्रेस सप्टेंबरअखेरपर्यंत धावणार

By atul.jaiswal | Updated: June 30, 2024 16:10 IST

दोन वर्षांपूर्वी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे.

अकोला : विदर्भातील प्रवाशांना गोव्याची वारी घडविणाऱ्या नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली असून, अकोलामार्गे धावणारी ही गाडी आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालविण्यात येणार आहे. या गाडीला अकोल्यात थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. गाडीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५४ फेऱ्या होणार आहेत.

असे आहे वेळापत्रक

सुधारित वेळापत्रकानुसार, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस (०११३९) ही द्विसाप्ताहिक गाडी ३ जुलै ते २९ सप्टेंबर पर्यंत नागपूर स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी दुपारी ३:०६ मिनिटांनी सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-नागपूर एक्स्प्रेस (०११४०) ही द्विसाप्ताहिक गाडी ४ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत दर गुरुवार व रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री ८:०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९:३१ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.

कोणत्या स्थानकांवर थांबा?

नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम (गोवा) तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे.