शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

वाशिम जिल्ह्यातील माझं गावं, माझं पाणी आता संपूर्ण विदर्भात!

By admin | Updated: December 5, 2014 23:42 IST

लोकमत इफेक्ट: पाणीटंचाई दूर करणारा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना.

संतोष मुंढे/ वाशिमजिल्ह्यातील चार गावांमध्ये पाणीटंचाईचे निवारण आणि सिंचनवाढीसाठी राबविण्यात आलेला माझ गावं, माझं पाणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता विदर्भातील अकराही जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना नागपूर आणि अमरावती विभागाचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी दिल्या आहेत. पाणीटंचाई दूर करून, सिंचनासाठीही उपयुक्त ठरणार्‍या या प्रकल्पावर लोकमतने प्रकाशझोत टाकला होता, हे विशेष. पाण्यासाठी कायम टँकरवर अवलंबून असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालूक्यांतर्गत येत असलेल्या सावरगाव फॉरेस्ट, रिसोड तालुक्यातील कवठा खूर्द, मालेगाव तालुक्यातील सुदी, अनसिंग आणि वाशिम तालुक्यातील भोयता या चार गावांमध्ये पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जलसंधारणाची कामे हाती घेतली होती. या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांनी भूजल सर्वेक्षण विभागाला एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर चारही गावांमध्ये जलसंधारणाच्या पथदश्री प्रकल्पाला सुरुवात झाली होती. वर्षभराचे काम अल्प कालावधीत, म्हणजे केवळ अडीच ते तीन महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाचे वरीष्ठ भूवैज्ञानिक बी.एस. गजभीये यांच्या नेतृत्वातील पथकाने पूर्ण केले. गावाजवळून वाहणार्‍या लहान, मोठय़ा नाल्यावर वरच्या बाजूला १५ ते २0 मिटर खोलीचे बोअर करण्यात आले. त्यामध्ये पावसाळ्य़ातील पाणी भूगर्भात सोडून जलपूनर्भरणाची व्यवस्था करण्यात आली. त्याखाली एक गॅबीयन बंधारा, त्यानंतर अडीच, तीन मिटर खोल व ९ ते १0 मिटर रुंद व १६0 ते २00 मिटर लांब असा पूनर्भरण चर बांधण्यात आला. मधल्या टप्यातही तीन बोअर, गॅबीयन बंधारा व तसाच पुनर्भरण चर बांधण्यात आला. शेवटच्या टप्प्यात तीन बोअर, गॅबीयन बंधारा, जलपूर्भरण चर, त्यानंतर आणखी तीन बोअर आणि एक मोठा भूमिगत बंधारा करण्यात आला. हे काम अंतीम टप्प्यात असतानाच मार्च, एप्रिलमध्ये परतीचा पाउस आला. त्यामुळे बोअरच्या सहाय्याने भूगर्भात जलपूनर्भरण होऊन चर पाण्याने तूडूंब भरले. त्यामुळे एरव्ही जानेवारी, फेब्रुवारीतच पाण्यासाठी टँकर बोलवावी लागणारी चारही गावे टँकरमुक्त झाली. यावर्षी पाऊस अत्यल्प झाला असला तरी, या चारही गावांमध्ये अद्याप जलसंकट ओढावलेले नाही. याशिवाय प्रत्येक गातील जवळपास १५0 एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास प्रकल्पामुळे मदत झाली. या यशोगाथेवर लोकमतने प्रकाशझोत टाकल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपसंचालकांनी हा प्रकल्प संपूर्ण विदर्भात राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने चारही गावातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. वरिष्ठांनी या कामाची दखल घेवून प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मागीतली होती. आता इतरत्र हा प्रकल्प राबविला जाणार असल्याने अभिमान वाटत असल्याचे वाशिम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णीयांनी मत नोंदविले.