शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

- हभप अशोक महाराज जायले, संत भास्कर महाराज पालखी, अध्यक्ष. ------------------------- वारी हा वारकऱ्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण ...

- हभप अशोक महाराज जायले, संत भास्कर महाराज पालखी, अध्यक्ष.

-------------------------

वारी हा वारकऱ्याच्या जीवनातील सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे. आषाढीच्या वारीची आस प्रत्येक वारकऱ्याला सहा महिन्यांपासून लागत असते. वारी वारकऱ्यांचा प्राण असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी खंडित झाल्याने दु:ख होत आहे. देवाने कोरोनाचे संकट दूर करावे व वारी पुन्हा सुरू व्हावी, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

-हभप राजू महाराज कोकाटे

-------------------------

वारकरी संतांनी वारीचं माहात्म्य सांगितले आहे. मी संत भास्कर महाराज पालखी सोहळ्यात वीणेकरी म्हणून गत २५ वर्षांपासून पायदळ वारी करीत आहे. या वारीतील अनुभव माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. माझे जीवन धन्य झाले आहे. परंतु, गत वर्षापासून वारी खंडित झाल्याचे शल्य सारखे बोचत राहते. पंढरपूर हे वारकऱ्यांचे माहेर आहे. विठोबाचे परम्‌ दर्शन व संतजनांच्या सहवासापासून मी पारखा झालो आहे. शासनाने नियम शिथिल करून वारकऱ्यांना वारीची परवानगी द्यायला पाहिजे होती. मनाला खंत वाटते. पंढरी वारी न चुकावी हीच मनोमन इच्छा आहे.

हभप मोहन महाराज रेळे, वडाळी सटवाई

----------------------

पंढरीची वारी, आहे माझे घरी!

पंढरीनाथाच्या परम्‌ दर्शनाची आंतरिक ओढ असून, वारी खंडित झाली, ही मनाला अस्वस्थ करणारी आहे. कोरोना आपत्तीने हा माहेराचा आनंदच जणू हिरावून घेतला आहे. विठुरायाचे अस्तित्व चराचरांत आहे. गुरूवर्य वासुदेव महाराजांनी आषाढी यात्रेत विठ्ठल चरणी देह ठेवून विठ्ठलरूप झाले, हा भावार्थ हृदयात साठवून श्रद्धासागर क्षेत्री गुरूवर्य महाराजांचे दर्शनाने पंढरीची वारी झाल्याचे समाधान प्राप्त झाले.

हभप विष्णू महाराज गावंडे

----------------------------

पंढरपूर मानस वारी केली!

माझे घरी पिढ्यान्पिढ्या पंढरीची वारी आहे. विठुरायाने बोलावले तरच वारी घडते. भगवंतास भक्तांचे जीविताची काळजी आहे. कोविड आपत्तीकाळात पंढरीला न जाता घरीच विठ्ठलाचे नामस्मरण करणे, हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. त्यामुळे पंढरीला न जाता विठ्ठलनामाचा गजर करीत मानस वारी मी पूर्ण केल्याचे समाधान आहे.

हभप ज्ञानेश्वर महाराज वसू.

------------------------

पंढरीची वारी परम् भाग्याचा क्षण

वारी परंपरेत ३१ वर्षे अखंडित पंढरीची वारी केली. पंढरीनाथाचे परम् दर्शन आणि संतजनांचा सहवास हा माझ्या जीवनाचा परम् भाग्याचा क्षण आहे. पंढरीची वारी गत दोन वर्षांत खंडित झाल्याने काहीतरी हरवल्यासारखे वाटते. ही मनाला वेदना देणारा प्रसंग का यावा, पंढरीनाथा! वारीचा मार्गच बंद झाला आहे. हे संकट दूर सारून पंढरीची वारी चुकू देऊ नको.

हभप सुधाकरराव महाराज पुंडकर.