शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदर कमी करण्यासाठी आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 10:51 IST

राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्याकरिता आता राज्यभरात ‘माझे कुटुंब-माझी जबाबादारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची जनतेच्या सहभागातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील कोविड-१९ रुग्णालयांमध्ये होणाºया रुग्णांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. त्यानुषंगाने यापुढे कोरोना विषाणूचा संसर्ग आणि मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी जनतेच्या सहभातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ‘माझे कुटुंब-माझी जबाबादारी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, ही मोहीम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे निर्देश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना ११ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे दिले आहेत. त्यानुसार १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाºया ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे, वस्त्या व तांडे यातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना उपचार आणि प्रत्येक नागरिकास भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. मोहिमेच्या कालावधीत गृहभेटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आरोग्य पथकांची संख्या निश्चित करण्यात आली असून, एका पथकात एक आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक सरपंच, नगरसेवकांनी निश्चित केलेले दोन स्वयंसेवक असणार आहेत. पथकातील या सदस्यांना ‘कोरोना दूत’ असे संबोधण्यात येणार आहे. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देणार असून, त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच दुर्धर आजाराच्या व्यक्तींची माहिती घेण्यात येणार आहे. ताप, खोकला, दम लागणे इत्यादी कोरोनासदृश लक्षणे असणाºया व्यक्तींना जवळच्या ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यभरात या मोहिमेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका इत्यादी यंत्रणांमार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.- संजय खडसेनिवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या