शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांनो काँग्रेसची गुलामी सोडा - सैयद मोईन

By admin | Updated: January 24, 2017 02:49 IST

पडघम मनपा निवडणुकीचे; एआयएमआयएमने फुंकला प्रचाराचा बिगुल

अकोला, दि. २४- निवडणुका आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिमांची आठवण येते आणि अनेक वर्षांपासून काँग्रेस भाजप, सेनेची भीती मुस्लिमांना दाखवून मते पदरात पाडून घेते; परंतु मुस्लिमांचा, त्यांच्या वस्त्यांचा विकास कधीच करीत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला साथ देणार्‍या मुस्लिमांनो आता तरी काँग्रेसच्या गुलामगिरीतून बाहेर पडा, असे आवाहन एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन यांनी येथे केले. जुने शहरातील भाजी बाजारात सोमवारी रात्री जाहीर सभेत ते बोलत होते. महापालिका निवडणूक प्रचाराचा बिगुल एआयएमआयएमने फुंकून प्रचाराच्या रणधुमाळीची सुरुवात केली. जाहीर सभेला एमआयएमचे शहराध्यक्ष जमील खान, सैयद मोहसिन अली, मोहम्मद मुस्तफा पहेलवान, इमरान हबीब खान, चाँद खान आदी होते. सैयद मोईन यांनी, अकोला महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती; परंतु मुस्लीम वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. काँग्रेसने केवळ धर्मनिरपेक्षतेचे सोंग घेतले आहे. हिंदू वस्त्यांचा काँग्रेसने विकास केला; परंतु मुस्लिमांची मते मिळवून सत्ता हस्तगत केली; परंतु मुस्लीम वस्त्यांचा विकास केला नाही, असा आरोप मोईन यांनी केला. ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भाजप, सेनेची, ठाकरे, मोदींची भीती दाखवून मुस्लिमांची मते मिळविली, सत्ता उपभोगली. आता सत्ता गेली तर मुस्लिमांचा एवढा कळवळा आला की, मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी काँग्रेस करू लागली. पंधरा वर्ष काँग्रेस सत्तेत असताना, मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही, असा सवालही सैयद मोईन यांनी केला. काँग्रेसनेसुद्धा मुस्लिमांसोबत भेदभाव केला. मुस्लिमांवर, आमच्या युवकांवर अन्याय, अत्याचार होतात. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता बोलायला पुढे येत नाही. गुजरातमध्ये दंगल झाली, दादरी कांड झाले; परंतु एकही काँग्रेसी नेता तेथे मुस्लिमांचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही आणि आमच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. पातूर नगर परिषदमध्ये सत्तेसाठी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजपसोबत कोण जात आहे, हे मुस्लिमांना ठाऊक आहे. काँग्रेस, भाजप हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुस्लिमांवर कुठेही अन्याय झाला तर एआयएमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी, अकबरूद्दीन ओवेसी धाऊन जातात. एक सक्षम पर्याय म्हणून एआयएमआयएम पुढे येत आहे. त्यामुळे मुस्लिमांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या कुबड्या फेकून दिल्या पाहिजेत, असेही प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन म्हणाले.काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये पैसे देऊन मुस्लीम नेते आणले जातात!-काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षामध्ये खरेदी करून मुस्लीम नेत्यांना आणले जाते आणि मुस्लिमांसमोर उभे केले जाते. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मुस्लीम नेत्यांना मुस्लिमांसोबत काही देणे-घेणे नाही. मुस्लिमांवरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध ते कधीही तोंडातून शब्द काढत नाही, असा आरोपही एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन यांनी जाहीर सभेत बोलताना केला. माजी नगरसेविकेचा पक्षप्रवेशलोकजनशक्ती पक्षाच्या माजी नगरसेविका शमीम बी रफिक कुरेशी यांनी सोमवारी एआयएमआयएम पक्षात अधिकृत प्रवेश घेतला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष सैयद मोईन यांनी स्वागत केले.