शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम लीग राज्यात अकोल्यासह २२ जागांवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:29 IST

अकोला: राज्यात इंडियन मुस्लीम लीग पार्टीची पायमुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अकोला: राज्यात इंडियन मुस्लीम लीग पार्टीची पायमुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत अकोल्यासह राज्यातील २२ जागांवर मुस्लीम लीग लढणार असून, दोन दिवसांत नांदेड येथून उमेदवारांची नावे घोषित करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुस्लीम लीग पार्टी महाराष्ट्रतर्फे रविवारी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष इम्रान अशरफी, मोहम्मद फिरोज शाह, मौलवी रहमत कार्यकारी सचिव, मौलवी हनिफ, मोहम्मद फिरोज यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यापूर्वी इंडियन युनियन मुस्लीम लीग पार्टीने अकोला मनपाच्या विरोधी पक्षाची भूमिका यशस्वी पार पाडली होती; परंतु त्यानंतर अकोल्यात मुस्लीम लीगचे काम रोडावले होते. दरम्यानच्या काळात समाजवादी पक्ष, एमआयएम आणि इतर मुस्लीम विचारधारेच्या पक्षांनी अकोल्यात पाळेमुळे पसरविण्यास सुरुवात केली; मात्र त्यात या पक्षांना यश मिळाले नाही. परिमाणी, मुस्लीम समाज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि आता वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांमध्ये विभागला. विविध पक्षांत विखुरलेल्या मुस्लीम समाजाला पुन्हा एक करण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडियन युनियन मुस्लीम लीग महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यानुषंगाने अकोल्यासह राज्यातील एकूण २२ जागांवर लढणार असल्याचे अफसर अली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी त्यांनी अकोल्याची कमान नजीव शेख यांना सोपविली असून, त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण