शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:26 IST

सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काँग्रेस, कम्युनिस्ट नेते सीएए, एनआरसीला विरोध करून जाती, धर्मांमध्ये विद्वेष निर्माण करीत आहेत. मुस्लीम समुदायाला भडकाविण्याचे काम करण्यात येत आहे. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्याचे, देशाबाहेर काढण्यासारखे चुकीचे संदेश काँग्रेसकडून पसरविल्या जात आहेत. सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले.राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ रविवारी मुंगीलाल बाजोरिया प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या विशाल रॅलीचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे, माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, लक्ष्मीनारायण दायमा महाराज, रा.स्व. संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, डॉ.नानासाहेब चौधरी, शशांक जोशी, समीर थोटगे, निशिकांत देशपांडे, प्रा. विवेक बिडवई आदी होते.दयाशंकर तिवारी म्हणाले की, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार झाले. पाकिस्तानमधील हिंदू, शीख समुदायाचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांचे धर्मांतर करण्यात आले; परंतु भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत. आम्ही राष्ट्रासोबत उभे राहणारे लोक आहोत. राष्ट्राच्या नावाने राजकारण करणारे नाहीत. या तीन देशांमधील अल्पसंख्यांक धर्माच्या लोकांना भारत नागरिकत्व देण्यास तयार आहे, असे सांगत, तिवारी यांनी अतिथी देवो भव: ही आमची संस्कृती आहे. आम्ही पारसी, पोर्तुगिजांना आश्रय दिला. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना आश्रय दिला. आदराने जो येईल त्याचा आम्ही सन्मान करू; परंतु जो आमच्या पाठीत खंजीर खुपसेल, त्याला जागा दाखवू. काँग्रेस, कम्युनिस्ट नेते सीएए, एनआरसीचे राजकारण करून मुस्लीम समुदायाची दिशाभूल करीत आहे. सीएए, एनआरसीमुळे मुस्लीम बांधवांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी चिंता करू नये, असे स्पष्ट करीत, तिवारी म्हणाले की, सीएए कायदा हा अडीच वर्षांच्या चर्चेनंतर संसदीय समितीने मंजूर केला आणि विधेयक संसदेत मांडले. या संसदीय समितीमध्ये सर्वच पक्षांचे नेते होते. त्यावेळी त्यांनी विरोध केला नाही आणि आता जात, धर्माचे राजकारण करण्यासाठी सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करीत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. सभेचे संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. राष्ट्रगितानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी