लोकमत न्यूज नेटवर्कउमई (मुर्तिजापूर): राजस्थानातील ट्रक क्लिनरची हत्या करून मृतदेह मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर नाकट फाट्यावर फेकल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राजू यास अटक केली आहे. उमई येथून जवळच असलेल्या जितापूर नाकट फाट्यावर ४ जानेवारी रोजी रात्री एका ट्रकमधून ४0 ते ४५ वय असलेल्या इसमाचा खून करून मृतदेह टाकण्यात आला. मृ तकाची ओळख पटू नये म्हणून त्यांच्या शरीराचे दोन तुकडे करून एका पोत्यात भरून फेकण्यात आला. तसेच त्यांचे डोके धडापासून वेगळे करण्यात आलेले आहे. या मृ तकाजवळ असलेल्या मोबाइलवरून पोलिसांनी संपर्क साधला असता तो राजस्थानातील असल्याचे समोर आले. तसेच मृतकाकडे असलेल्या आधार कार्डवर नंदलाल असे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास वेगाने फिरवत ट्रक चालक राजू यास अटक केली आहे. पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
मुर्तिजापूर : राजस्थानातील क्लिनरची हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:47 IST
उमई (मुर्तिजापूर): राजस्थानातील ट्रक क्लिनरची हत्या करून मृतदेह मूर्तिजापूर तालु क्यातील जितापूर नाकट फाट्यावर फेकल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राजू यास अटक केली आहे.
मुर्तिजापूर : राजस्थानातील क्लिनरची हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर!
ठळक मुद्दे४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घटना उघडकीस आली मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी केली ट्रक चालकास अटक