लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम (मुर्तिजापूर) : माना येथून जवळच असलेल्या मलकापूर येथे मध्य प्रदेशच्या २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.प्राप्त माहितीवरून ग्राम मलकापूर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या कामावरील ठेकेदाराच्या पोकलँड मशीनवर काम करणारा व मध्य प्रदेशच्या शिवणी जिल्हय़ातील सुरेखा टोला भीमगढ कॉलनी येथील रहिवासी सिनोद सुमिलाल परते याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी माना पोलीस स्टेशनमध्ये दिनेश खांडे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. चंदू पाटील करीत आहेत.
मुर्तिजापूर : मलकापूर येथे मध्य प्रदेशच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:14 IST
कुरूम : माना येथून जवळच असलेल्या मलकापूर येथे मध्य प्रदेशच्या २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
मुर्तिजापूर : मलकापूर येथे मध्य प्रदेशच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!
ठळक मुद्देमृत युवक रस्ता रुंदीकरणासाठीच्या पोकलँड मशीनवर कामावर होताआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टमाना पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद