शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूरात लॉकडाऊनचा परीणाम नाही; अनेक दुकाने सताड उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:43 IST

Lockdown : काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्धशटर उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची पूर्ण दुकाने उघडी दिसून आली.

मूर्तिजापूर : ५ एप्रिलच्या रात्री पासून मिनी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पार फज्जा उडाला आहे. लॉकडाऊन संदर्भात व्यापारी संभ्रमात असल्याने  खुल्लम खुल्ला व्यवहार केल्याचे चित्र पहायला मिळाले.           शहरात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने उघडी होती, काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे अर्धशटर उघडे ठेवून व्यवहार केला तर काहींची पूर्ण दुकाने उघडी दिसून आली. या संदर्भात दुकानदारांना विचारणा केली असता आम्हाला कुठलाही आदेश प्राप्त झाला नसल्याने आम्ही दुकाने उघडली असल्याचे त्यांनी सांगितले, यात रेडीमेड गारमेंट, चप्पल दुकान, कपड्यांची दुकाने, मोबाईल दुकाने यासह बहूतेक दुकाने, बार रेस्टॉरंट उघडी दिसून आली. त्याच बरोबर स्टेशन विभाग भरवणारा मंगळवार आठवडी बाजारही भरल्याने तिथे नागरीकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने लॉकडाऊन आहे की नाही हे सामान्य नागरीकांना समजने कठीण होते. परीणामी शहरात लॉकडाऊनचा कुठलाही परीणाम न होता या कालावधीत नागरीकांची गर्दी दिसून आली. लॉकडाऊन पाळण्यासाठी यात खऱ्या अर्थाने प्रशासकीय यंत्रणा खुजी ठरल्याची चर्चा शहरात होती  महामार्गावरील बार बिनबोभाट सूरू

३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कुठलेही दुकान सुरु राहणार नाही असे निर्देशित केले असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेले हॉटेल आणि बार तळीरामांनी तुडूंब भरलेले आढळून आले मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने यात शासकीय कर्मचाऱ्यांचा भरणा अधिक दिसून आला. बाजाराचा दिवस असल्याने बेवड्यांनी लाखों रुपयांची दारु रिचवली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला