शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर नगरपालिकेची महावितरणशी जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:30 IST

मूर्तिजापूर: मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अशी सर्वच कार्यालये इतरांकडे असलेल्या आपल्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सध्या पूर्ण शक्तीनिशी धडपडत आहेत. त्यासाठी कुठे प्रेमाने तर कुठे कायदेशीर अधिकारांचा वापर करून जबरीने का होईना कर अथवा थकीत बिलाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वसुलीच्या कारणावरून मूूर्तिजापूर नगरपालिका आणि महावितरण ही दोन्ही कार्यालये आपसात भिडली असल्याचे चित्र २८ मार्च रोजी स्पष्ट झाले.

ठळक मुद्देमहावितरण : वीज बिल भरा; नाहीतर विद्युत पुरवठा बंद करू!

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था अशी सर्वच कार्यालये इतरांकडे असलेल्या आपल्या थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सध्या पूर्ण शक्तीनिशी धडपडत आहेत. त्यासाठी कुठे प्रेमाने तर कुठे कायदेशीर अधिकारांचा वापर करून जबरीने का होईना कर अथवा थकीत बिलाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वसुलीच्या कारणावरून मूूर्तिजापूर नगरपालिका आणि महावितरण ही दोन्ही कार्यालये आपसात भिडली असल्याचे चित्र २८ मार्च रोजी स्पष्ट झाले. महावितरणची पथदिव्यांच्या विद्युत बिलाची २९ लाखांची रक्कम न. प. कडे थकीत असून, त्याची मागणी महावितरणने नगरपालिकेला २८ मार्च रोजी नोटीस देऊन केली. विशेष म्हणजे सदर नोटीसमध्ये बिलाची थकीत रक्कम त्वरित भरा अन्यथा शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू, अशी धमकी देण्यात आली. दरम्यान न. प. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी महावितरणकडे नगरपालिकेची थकीत असलेली मालमत्ता कराची ५ लाख रुपयांची रक्कम त्वरित भरा, अन्यथा कार्यालयास सील ठोकू, असा इशारा दिला आहे. महावितरण असो नाही तर मूर्तिजापूर नगरपालिका असो, यापैकी कुणाची रक्कम दुसऱ्याकडे किती जास्त प्रमाणात थकीत आहे, तो मुद्दा महत्त्वाचा नसून, वसुली जास्तीत जास्त व्हावी, हा दोन्ही कार्यालयांचा हेतू असतो. दोन्ही कार्यालये महाराष्टÑ शासनाच्या अखत्यारीत येतात; परंतु नगरपालिकेस अधिकार जास्त आहेत. नगरपालिका करवसुलीसाठी कार्यालयाला सील ठोकणे, मालमत्तेचा लिलाव करणे अशी कारवाई करू शकते. महावितरण कार्यालयास कोणतीही कारवाई करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. कारण विद्युत पुरवठा हा जनतेच्या जीवनाशी निगडित असतो. रस्त्यावरील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी नगरपालिकेस वेठीस धरणे, असा प्रकार होतो.आमच्या नगरपालिकेने मागील वर्षी वीज बिलादाखल ५५ लाख रुपये महावितरणला दिले. आजही २९ लाख ६० हजारांचा धनादेश लिहून व सही करून तयार आहे. महावितरणच्या अधिकाºयांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या मालमत्ता कराची रक्कम भरून हा धनादेश घेऊन जावा.- दादाराव डोल्हारकर,मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर.नगरपालिकेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आम्हाला वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांची मालमत्ता कराची मागणीही योग्य आहे.- जोगी, सहायक अभियंता, महावितरण, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरmahavitaranमहावितरण