शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या वादातून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:10 IST

अकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक  फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे निखिल पळसपगार, विक्की कपले व काही मित्र जेवण करीत असताना आरोपींनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. आरोपींनी निखिलच्या छातीवर लोखंडी पाईप व धारदार शस्त्राने वार केले. यात तो जागीच ठार झाला.  पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला.  काही आरोपींना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले.

अकोला: वार्डात लावलेले वाढदिवसाचे फलक  फाडल्याच्या वादातून पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेला निखिल अशोक पळसपगार(20 रा. मोठी उमरी) याचा मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी विक्की संतोष कपले(20 रा.मोठी उमरी) हा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास नेहरू नगरात घडली. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. द्वारका नगरी फत्तेपूरवाडीत राहणारा अक्षय प्रदीप देशमुख(23) याच्या तक्रारीनुसार  जुना वाद व वाढदिवसाचे फलक  फाडल्याच्या वादातून आरोपी आशिष उर्फ पहेलवान रमेश मोकळकर, रमेश मोकळकर, गणेश समाधान भातुलकर, अंकुश राजेश नेरकर आणि शुभम एकनाथ कोरकणे(सर्व रा. मोठी उमरी) हे नेहरू नगर येथे आले. निखिल पळसपगार, विक्की कपले व काही मित्र जेवण करीत असताना आरोपींनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. आरोपींनी निखिलच्या छातीवर लोखंडी पाईप व धारदार शस्त्राने वार केले. यात तो जागीच ठार झाला. विक्की कपले हा गंभीर जखमी झाला तर इतर मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळावर सिव्हिल लाईन पोलिसांनी धाव घेतली आणि जखमी विक्की कपले याला सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला.  काही आरोपींना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले.

टॅग्स :AkolaअकोलाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशनMurderखून