शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सासूची हत्या; आरोपी जावई कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:23 IST

अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील बिहाडमाथा येथे जावयाने सासूची हत्या केली व तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला आग्रा येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत आरोपी जावयाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

ठळक मुद्दे बाश्रीटाकळी तालुक्यातील बिहाडमाथा येथे जावयाने सासूची हत्या केली व तो पळून जाण्यात यशस्वी झाला होतापोलिसांनी आग्रा येथून केली जावयाला अटक १९ ऑक्टोबरपर्यंत आरोपी जावयाची पोलीस कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील बिहाडमाथा येथे जावयाने सासूची हत्या केली व तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला आग्रा येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत आरोपी जावयाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रमिला भगवान आठवले (वय ५0) असे मृतक महिलेचे नाव आहे. प्रमिला आठवले यांच्या मुलीचा विवाह उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुन्नेश पुरणचंद निमकाळे याच्यासोबत झाला होता. मुन्नेश हा पत्नी दीपालीचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने दीपाली माहेरी राहत होती. पत्नी दीपालीला सासू प्रमिला आठवले आपल्यासोबत नांदायला पाठवत नाही, याचा राग आल्याने जावई मुन्नेश याने १२ ऑक्टोबर रोजी सासूचा खून केला. याप्रकरणी दीपालीच्या तक्रारीवरून बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात मुन्नेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटना घडल्यापासून आरोपी मुन्नेश हा गायब झाला होता. पीएसआय चव्हाण यांनी आरोपीला मंगळवारी आग्रा येथून अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीच्यावतीने अँड. वैशाली गिरी भारती व अँड. केशव एच. गिरी यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Crimeगुन्हा