शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अनैतिक संबंधातून इसमाची हत्या

By admin | Updated: May 23, 2014 00:12 IST

प्रेत जमिनीत पुरले, भेंडगावच्या महिलेस अटक

पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथे एका इसमाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे खळबळजनक प्रकरण गुरुवारी उघडकीस आले. महादेव रामभाऊ निलखन रा. बार्शीटाकळी असे मृतकाचे नाव आहे. पिंजर पोलिसांनी या प्रकरणी मंजुळाबाई देवीदास भगत या महिलेस अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, महादेव निलखन हा भेंडगावातील या महिलेच्या घरी नेहमी यायचा. २१ मे रोजी सकाळी तो येथे आला. दरम्यान मंजुळा व महादेव यांच्यात वाद झाला. यानंतर त्याने आत्महत्या केली, अशी माहिती मंजुळाने पोलिसांना दिली; परंतु मंजुळाबाईने त्याचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहेत. मंजुळाबाईच्या घरात मरण पावलेल्या महादेवच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी तिने २२ मे रोजी दोन मजुराच्या मदतीने घरासमोर खड्डा खोदला. सकाळी ९.३० नंतर मजूर चहापाणी घेण्यासाठी बाहेर गेले असता, या महिलेने महादेवचे प्रेत त्या खड्ड्यात पुरले व माती ओढून घेतली. मंजुळाबाईच्या हालचाली सकाळपासूनच संशयास्पद वाटत असल्याचे शेजारी राहणार्‍या एका इसमाच्या लक्षात आले. मंजुळाबाईने अचानक खड्डा का खोदला? यावर गावात चर्चा सुरू झाली. यानंतर या खड्ड्यात कोणाचे तरी प्रेत असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच ठाणेदार एम.एम. ठाकरे व ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मंजुळाबाईला ताब्यात घेतले असता, तिने घटना सत्य असल्याचे सांगितले. मात्र, महादेवने आत्महत्या केली; मी त्याला जमिनीत पुरले, अशी माहिती मंजुळाबाईने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अनैतिक संबंधातून वाद निर्माण झाल्याने मंजुळाबाईनेच हा खून केल्याचा दावा पोलिस करीत आहेत. सध्या महादेव निलखन याचे प्रेत जमिनीत असून, तहसीलदारांच्या उपस्थितीत २३ मे रोजी जागेचे उत्खनन होणार आहे.