शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी पालिका सरसावली

By admin | Updated: September 2, 2016 02:06 IST

पथकांचे गठन: पाच ग्रामपंचायतींमधील दस्तावेजांची केली तपासणी.

अकोला, दि. १: महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले. उपायुक्त सुरेश सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या विविध पथकांनी गुरुवारी पाच ग्रामपंचायतींमधील दस्तावेजाची तपासणी केली. सदर दस्तावेज शुक्रवारपासून ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.महापालिकेच्या हद्दवाढीत शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाला आहे. हद्दवाढीची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींमधील प्रशासकीय दस्तावेज ताब्यात घेण्याला सुरुवात होणार आहे. यामध्ये २४ गावांमधील ग्रामपंचायतीची इमारत, जिल्हा परिषदेच्या इमारती, निर्माणाधीन बांधकामांपासून ते कार्यरत कर्मचार्‍यांच्या समायोजनासह विविध विभागाच्या दस्तावेजांचा समावेश राहील. अतिशय गुंतागुंतीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाने हस्तांतरणाची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, याकरिता अधिकार्‍यांच्या संयुक्तिक पथकाचे गठन करण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी उपायुक्त सुरेश सोळसे यांच्याकडे सोपवली. यादरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य, जन्म-मृत्यू दाखला विभागासह इतर अनेक मुद्यांची माहिती व दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी मनपाच्या स्तरावर अधिकारी-कर्मचार्‍यांची पथके निर्माण करण्यात आली. या सर्व पथकांनी गुरुवारी शहरालगतच्या पाच ग्रामपंचायतींमधील दस्तावेजांची तपासणी केली असून शुक्रवारी सदर कागदपत्रे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.या ग्रामपंचायतींची केली तपासणीमनपा उपायुक्त सुरेश सोळसे, मुख्य लेखाधिकारी बावस्कर यांच्या उपस्थितीत मलकापूर, खडकी, शिवणी, शिवर व उमरी ग्रामपंचायतमधील दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. यावेळी मनपाच्या जलप्रदाय विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी दस्तावेजांची तपासणी केली.हद्दवाढ झाल्यावर बैठक!राज्य शासनाने ३0 ऑगस्ट रोजी हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. ज्या दिवशी अधिसूचना जारी केली, त्या दिवशी नियमानुसार ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची पदे रद्द झाली, असे असतानादेखील मलकापूर ग्रामपंचायतच्यावतीने ३१ ऑगस्ट रोजी एक बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे.'बॅकडेट'मध्ये पराक्रम नको!मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमधून दस्तावेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण केली जाणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे. यादरम्यान, संबंधित ग्रामसेवकांनी ह्यबॅकडेटह्णमध्ये कोणतेही पराक्रम करू नयेत. तसे आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.-ग्रामपंचायतींमधील सर्व प्रकारचे दस्तावेज ताब्यात घेतल्या जातील. त्यांची पडताळणी केली जाईल. तसा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाईल.- अजय लहाने, आयुक्त, मनपा