शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळा विद्यार्थ्यांसाठी मेजवानी; क्रीडा स्पर्धांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:14 IST

महापालिकेने स्थानिक वसंत देसाई क्रीडांगण येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा स्पर्धेचे तसेच १० फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे यंदा आयोजन केले जाणार असून, ही शालेय विद्यार्थ्यांसाठी मेजवानी ठरणार आहे. महापालिकेने स्थानिक वसंत देसाई क्रीडांगण येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा स्पर्धेचे तसेच १० फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण असल्याचे बोलल्या जात आहे.महापालिकेच्या शिक्षण विभागाला दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे शक्य असले तरी नियोजनाचा अभाव आणि उदासीनतेमुळे क्रीडा स्पर्धांना बगल दिली जाते. त्या तुलनेत खासगी शाळांमध्ये प्रत्येक वर्षी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याचे दिसून येते. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशातून उशिरा का होईना, यंदा महापालिकेने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे ५ ते ८ फेब्रुवारी या दरम्यान विविध स्पर्धा पार पडतील. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर धावण्याची शर्यत, दोरीवरील उड्या, बटाटा स्पर्धा, लंगडी, लिंबू चमचा स्पर्धा, इयत्ता ५ ते ६ मधील विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, रस्सीखेच, १०० मीटर धावणे, लंगडी, तीन पायांची शर्यत, पोत्याची शर्यत तसेच लांब उडी आणि इयत्ता ७ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, फुटबॉल, व्हॉलीबॉल, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

१० फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रममनपाच्यावतीने प्रमिलाताई ओक सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायन, समूह नृत्य, समूहगान, नाटिका, एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

शिक्षकांसाठीही स्पर्धाशाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबतच प्रशासनाने मराठी, हिंदी व उर्दू माध्यमातील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिक्षकांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल तसेच शिक्षिकांसाठी रांगोळी स्पर्धा, पूजा थाली सजावट स्पर्धेचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका