शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांकडे महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:41 IST

खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना अंधारात ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.

अकोला: महापालिका क्षेत्रात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात भरती करण्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने पॉझिटिव्ह रुग्णांकडे सपशेल पाठ फिरविल्याची धक्­कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही वैद्यकीय यंत्रणेकडून रुग्णांची दखल घेतली जात नसून, याप्रकरणी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना अंधारात ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सपशेल कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या सोबत संपर्क साधणे तसेच घरी जाऊन कुटुंबीयांची व 'हायरिस्क' मधील नागरिकांची आरोग्य तपासणी करून संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी वैद्यकीय यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे दिलेली जबाबदारी काढून घेत वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. आयुक्तांच्या निर्णयाला सार्थ ठरविणे अपेक्षित असताना या विभागाकडून प्रशासनाची सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचे समोर आले आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही संबंधित रुग्णाला अवगत केले जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. आज रोजी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेची जबाबदारी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख शेख यांच्याकडे सोपवली असून, त्यांच्या अधिनस्त असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिका कोरोनाचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.क्षेत्रिय अधिकारी ठरले होते सरस!शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, घरामध्ये निर्जंतुकीकरण करणे व संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपवली होती. क्षेत्रिय अधिकाºयांच्या दिमतीला शिक्षक, आशा स्वयंसेविका तसेच टॅक्स विभागातील वसुली निरीक्षक होते. आयुक्तांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यात वैद्यकीय यंत्रणेपेक्षा क्षेत्रीय अधिकारी सरस ठरले होते, हे विशेष.

आरोग्य यंत्रणेच्या दिव्याखाली अंधार!मनपाचे काही वैद्यकीय आरोग्य अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात बसून कोरोनाला आळा घालण्याच्या रूपरेषेत व्यस्त असल्याची चर्चा आहे. शहरातील दहा नागरी आरोग्य केंद्रांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जबाबदारी सोपवून हात झटकण्याचा प्रयत्न पाहता प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या