शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारती, प्लॉटच्या नोंदणीवर महापालिकेची टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 12:08 IST

बुलडाणा : महानुभाव, निर्गुण व निराकार परमेश्वर म्हणून ओळख असलेले श्रीचक्रधर स्वामी महाराष्ट्र भ्रमंतीवेळी मेहकर येथे आले असता भैरव व बाणेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते.

ठळक मुद्देनिबंधकांसोबत समन्वय साधून त्यांना सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.शासनाने हार्डशिप अ‍ॅन्ड कम्पांउडिंग नियमावली अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

- आशिष गावंडे

अकोला : महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, इमारती अथवा प्लॉटिंगची समस्या रोखण्यासाठी अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारती, घरे तसेच प्लॉटची नोंदणी जिल्हा निबंधकांनी करून घेऊ नये, यासाठी निबंधकांसोबत समन्वय साधून त्यांना सूचना दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.अनधिकृत इमारतींना आळा घालण्याच्या उद्देशातून शासनाने ‘डीसीआर’( विकास नियंत्रण नियमावली) लागू केला. त्याकरिता चटई निर्देशांकात (एफएसआय) वाढ करण्यात आली. शिवाय डिसेंबर २०१५ पर्यंतच्या अनधिकृत इमारतींना नियमानुकूल करण्याचा निर्णय घेत शासनाने हार्डशिप अ‍ॅन्ड कम्पांउडिंग नियमावली अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. एकूणच अनधिकृत इमारतींना आळा बसावा, विकास कामे करताना अतिक्रमणाची समस्या निर्माण होणार नाही, असा शासनाचा उद्देश आहे. असे असले तरी शहराच्या विविध भागात गुंठेवारीचे लेआउट करताना मालमत्ताधारक नियम-निकष पायदळी तुडवित असल्याचे चित्र आहे. लेआउटमध्ये नियमानुसार रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह जलवाहिनीची कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. तसे न होता महापालिकेच्या नगररचना विभागातून लेआउटच्या नकाशाला मंजुरी मिळवल्यानंतर मालमत्ताधारक मनमानी पद्धतीने प्लॉटची विक्री करीत असल्याचे प्रकार होत आहेत. यामुळे प्लॉटची खरेदी करणाºया ग्राहकांची फसवणूक होत आहे. तसेच मनपाकडून बांधकामाचा नकाशा मंजूर केल्यावरही काही बांधकाम व्यावसायिक इमारती उभारत असल्याचे समोर येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी जिल्हा निबंधकांकडे होणाºया खरेदी-विक्रीच्या नोंदणीवर टाच आणण्याचा निर्णय घेतला आहे.निबंधकांसोबत साधणार समन्वय!निबंधक कार्यालयात खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना अशा अनधिकृत इमारती, घरांसह प्लॉटची रजिस्ट्री न करण्यासाठी निबंधकांसोबत समन्वय साधला जाणार आहे. मनपा क्षेत्रातील अधिकृत, अनधिकृत बांधकामांची प्रभागनिहाय माहिती दुय्यम निबंधकांकडे दिली जाईल. त्यासंदर्भात शासनाचे सक्तीचे निर्देश आहेत. अशा अनधिकृत मालमत्तांची नोंदणीच निबंधकांनी करून घेऊ नये, असे शासनाचे निर्देश असल्याने त्यानुषंगाने मनपा पाऊल उचलणार असल्याची माहिती आहे.मालमत्ताधारक लेआउट करताना नियम-निकषाचे पालन करीत नसल्याचे समोर आले आहे. अनधिकृत इमारती, सदनिका, कमर्शियल कॉम्प्लेक्स, डुप्लेक्स आदींचे बांधकाम नियमात नसेल तर त्यांची नोंदणी न करण्यासंदर्भात निबंधक कार्यालयासोबत समन्वय साधला जाईल. यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.-जितेंद्र वाघ, आयुक्त मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका