शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

तर महापालिकांचे अनुदान होणार बंद; शासनाचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:53 IST

अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी किमान ८0 टक्के कचर्‍याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास त्यांना शासन स्तरावरून दिल्या जाणारी अनुदाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी नगर विकास विभागाने घेतला आहे. 

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणांतर्गत घनकचर्‍यावर प्रक्रिया बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ  सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी किमान ८0 टक्के कचर्‍याचे निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास त्यांना शासन स्तरावरून दिल्या जाणारी अनुदाने बंद करण्याचा निर्णय सोमवारी नगर विकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या घरी शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन त्यांना मनपा प्रशासनाच्या स्तरावर शौचालय बांधून देण्यात आले. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला. मोहिमेचा उद्देश सफल झाला की नाही, हे तपासण्यासाठी राज्य शासनाच्या चमूने संबंधित महापालिका क्षेत्राची तपासणी केली होती. ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानामध्ये शहर हगणदरीमुक्त करणार्‍या महापालिका, नगरपालिकांची घोषणा राज्य शासनाने केली होती. या मोहिमेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता स्वच्छतेची मोहीम कायम सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासनाने जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात केंद्र शासनाच्या चमूने विविध शहरातील स्वच्छतेच्या कामाची तपासणी केली असता काही शहरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून आले होते. शिवाय, साठवणूक केलेल्या घनकचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे शहरांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाल्याचे चित्र तपासणीदरम्यान समोर आले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत नगर विकास विभागाने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानांतर्गत घनकचर्‍यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू न करणार्‍या महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कचर्‍यावर प्रभावी उपाय नाहीच!शहर मोठे असो वा लहान, दैनंदिन निघणार्‍या कचर्‍याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावल्या जात नसल्यामुळे शहरांमध्ये घनकचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे. कचर्‍यावर थातूरमातूर प्रक्रिया करणारे अनेक मोठे प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे कमी खर्चात कचर्‍यावर प्रक्रिया शक्य झाल्यास ही समस्या निकाली निघण्यास मदत होणार असल्याचा सूर महापालिकांमधून उमटत आहे.

जागेवरच विलगीकरणाची अटशहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी निर्मितीच्या जागेवरच विलगीकरण केलेल्या कचर्‍यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची अट शासनाने बंधनकारक केली आहे. त्यासाठी ३0 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२0१८ मध्ये चांगले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका