शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून खासगी शाळांना व्यावसायिक कर आकारणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:12 IST

अकोला : केंद्र शासनाने मोफत शिक्षणाचा कायदा (आरटीई) केला. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत व दर्जेदार शिक्षण अनुदानित खासगी प्राथमिक शाळांकडून दिल्या जाते. असे असतानाही महापालिकेच्यावतीने खासगी शाळांना व्यावसायिक कर आकारणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअकोला महापालिकेच्यावतीने अव्वाच्या सव्वा व्यावसायिक कर आणि नळभाडे आकारणी करण्यात येत आहेत. व्यावसायिक कर व नळभाडे देण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. महापालिकेने हा कर माफ करण्याची मागणी शाळांकडून होत आहे.

अकोला : केंद्र शासनाने मोफत शिक्षणाचा कायदा (आरटीई) केला. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत व दर्जेदार शिक्षण अनुदानित खासगी प्राथमिक शाळांकडून दिल्या जाते. असे असतानाही महापालिकेच्यावतीने खासगी शाळांना व्यावसायिक कर आकारणी करण्यात येत आहे. हा प्रकार मोफत शिक्षण कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. खासगी शाळांनी कर भरावा तर विद्यार्थ्यांना मोफत कसे शिकवावे, असा सवाल शाळांनी उपस्थित केला आहे.शहरातील खासगी प्राथमिक शाळांना शासनाकडून अनुदान मिळते. शिक्षकांचे वेतन त्यातून होत असल्याने खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनाडोनेशन, कोणतेही शैक्षणिक शुल्क न घेता मोफत शिकविल्या जाते. आरटीई २00९ च्या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असतानासुद्धा अकोला महापालिकेच्यावतीने अव्वाच्या सव्वा व्यावसायिक कर आणि नळभाडे आकारणी करण्यात येत आहेत. खासगी शाळांना मोठ्या रकमेची देयके देण्यात येत आहेत. त्यामुळे या देयकाची रक्कम शाळांनी कुठून भरावी, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण कायद्याचे महापालिका प्रशासनाकडून उल्लंघन होत आहे. व्यावसायिक कर व नळभाडे देण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. शिक्षकांनी त्यांच्या वेतनातून कर भरावा का, कराचा भरणा केल्यास विद्यार्थ्यांना मोफत कसे शिकवावे, असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेने हा कर माफ करण्याची मागणी शाळांकडून होत आहे.खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे पालकमंत्र्यांना निवेदनमहापालिकेकडून अनुदानित खासगी प्राथमिक शाळांना व्यावसायिक कर व पाणीपट्टी कराची देयके देण्यात येत असल्याने मोफत शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, महापालिकेने अनुदानित खासगी शाळांना कर माफ करावा किंवा २५ टक्के कर आकारावा आणि नळांना विनामिटर पूर्वीप्रमाणेच कर घ्यावा, अशी मागणी खासगी प्राथमिक संघाच्यावतीने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे करण्यात आली. रविवारी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष मनीष गावंडे, सचिव मो. जावेदुजम्मा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्यावेळी विभागीय अध्यक्ष गजानन सवडतकर, जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र चिमणकर, मुख्याध्यापक अल्केश खेंडकर, उपाध्यक्ष राहुल भगत व संघटक मिर्झासिंग आजळे उपस्थित होते.नागपूर मनपाने केल्या खासगी शाळा करमुक्त!नागपूर महापालिकासुद्धा खासगी प्राथमिक शाळांकडून व्यावसायिक कर, पाणीपट्टी कर वसूल करीत होती; परंतु मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार नागपूर महापालिकेने त्यांच्या क्षेत्रातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळा, माजी सैनिकांना करातून सूट दिली आहे. त्याच पृष्ठभूमीवर अकोला महापालिकेनेसुद्धा निर्णय घेऊन शाळांना करमुक्त करावे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSchoolशाळा