शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

घर बांधकामांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेचे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:57 IST

हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी १४ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात शिबिराचे आयोजन केले आहे

अकोला: घराचा नकाशा मंजूर होण्यासाठी सर्वसामान्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी १४ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात घर बांधकामांच्या नकाशामधील त्रुटी दूर करून तातडीने परवानगी दिली जाणार असल्याची माहिती सोमवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.कमर्शियल कॉम्प्लेक्स, रहिवासी अपार्टमेंटसह घर बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. मोठ्या इमारतींचे नकाशे मंजूर करताना अनेकदा त्रुटी निघतात. यादरम्यान, घरांच्या नकाशा मंजुरीसाठीसुद्धा सर्वसामान्य अकोलेकरांना मनपाचा उंबरठा झिजवावा लागतो. आजमितीला नगररचना विभागामध्ये १४० ते १५० बांधकाम नकाशे मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत. संबंधित मालमत्ताधारकांनी त्रुटी पूर्ण केल्यावरही परवानगीला विलंब होत असल्याचे समोर आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिली. यासंदर्भात अनेकदा नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होतात. या सर्व बाबी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना तातडीने परवानगी मिळावी, या उद्देशातून १४ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात नगररचना विभागाच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त कापडणीस यांनी दिली. या शिबिरात मालमत्ताधारकांनी सादर केलेल्या नकाशामध्ये काही त्रुटी निघाल्यास संबंधितांना एक आठवड्याचा कालावधी दिला जाईल. या कालावधीत त्रुटी दूर केल्यास पुन्हा २२ फेब्रुवारी रोजी आयोजित शिबिरात बांधकाम मंजुरी दिली जाईल. मनपाच्या या उपक्रमाचा सर्वसामान्य अकोलेकरांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला नगररचनाकार संजय पवार, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे आदी उपस्थित होते.रात्री उशिरापर्यंत चालेल कामकाज!सर्वसामान्यांना सोयीचे व्हावे म्हणून मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता शिबिराला प्रारंभ होईल. यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करून बांधकाम परवानगी दिली जाईल. सदर कामकाज रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहू शकते, अशी माहिती आयुक्त कापडणीस यांनी दिली. या शिबिरात कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा रहिवासी अपार्टमेंटच्या नकाशांना परवानगी दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका