अकोला- महापालिका परवाना विभागाच्यावतीने रविवारी शहरातील ७ हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावली. त्यापैकी हॉटेल तुषारला सील लावण्याची कारवाई करण्यात आली. मनपा परवाना विभागाच्यावतीने नूतनीकरण मोहीम हाती घेण्यात आली. खाद्यगृहाचा परवाना नूतनीकरण न करणार्या शहरातील ७ हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये मूर्तिजापूर रोडवरील हॉटेल तुषार, न्यू महाकाली रेस्टॉरंट अँण्ड बार, जयहिंद चौकातील मे. अँरिस्टो रेस्टॉरंट अँण्ड बार, माधवनगरमधील हॉटेल ब्लू रेस्टॉरंट, एम.पी. व्हेज नानव्हेज रेस्टॉरंट, टिळक रोडवरील किसान भोजनालय, सिंधी कॅम्पमधील हॉटेल पूजा आदी हॉटेलचा समावेश आहे. यापैकी हॉटेल तुषारच्या खाद्यगृहाला सील लावण्याची कारवाई करण्यात आली. न्यू महाकाली, हॉटेल ब्लू आणि एम.पी. रेस्टॉरंट या हॉटेलच्या व्यावसायिकांनी विभागीय आयुक्तांकडून स्थगनादेश मिळविला आहे. अँरिस्टो रेस्टॉरंट, किसान भोजनालय आणि हॉटेल पूजा येथे मनपाचे अधिकारी कारवाईसाठी गेले असता ही तिन्ही प्रतिष्ठाने बंद आढळलीत. ही कारवाई झोनल अधिकारी कैलाश पुंडे, परवाना अधीक्षक राजेंद्र गोतमारे, प्रभारी परवाना निरीक्षक संदीप जाधव, सुरेंद्र जाधव आदींनी केली.
हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध महापालिकेची कारवाई
By admin | Updated: December 1, 2014 00:32 IST