शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हडपलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी सरसावली महापालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:40 IST

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावाने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नावेद शेख इब्राहीम यांना विक्री केला होता.लोकमतच्या वृत्तानंतर महापालिकेचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान वाचले असून, भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीनंतर मनपाने तातडीने पावले उचलून सदर भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरूकेली आहे.

- सचिन राऊत

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावाने करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सदर भूखंडावरील शाळेचे अतिक्रमण काढून त्यावर तारेचे कुंपण घेऊन भूखंड प्रत्यक्ष मनपाच्या ताब्यात घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेच्या मालकीचे असतानाही सदर चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नावेद शेख इब्राहीम यांना विक्री केला होता. महापालिकेच्या मालकीचा भूखंड विक्री झाल्याचे लोकमतने निदर्शनास मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशावरून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांनी शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावे असलेल्या भूखंडाच्या फेरफार नोंदीचे पुनर्विलोकन केले. त्यानंतर सदर भूखंडाच्या फेरफार नोंदीमध्ये असलेले शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावाची नोंद रद्द करून हा भूखंड महापालिकेच्या नावाने नोंदणी करण्यात आला आहे. लोकमतच्या वृत्तानंतर महापालिकेचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान वाचले असून, भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीनंतर मनपाने तातडीने पावले उचलून सदर भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरूकेली आहे. सदर शाळेचे अतिक्रमण लवकरच काढण्याचे निर्देश मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका