शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांच्या क्षेत्रीय अधिकारी, अभियंत्यांना कानपिचक्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:32 IST

अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाºया मनपाच्या क्षेत्रीय अधिकाºयांसह नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यप्रणालीचा सोमवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेत संबंधितांचे चांगलेच कान उपटले.

ठळक मुद्दे बांधकाम जास्त आढळणाºया इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागाला दिले होते. अडीच महिन्यांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी काय दिवे लावले, याचा आयुक्त वाघ यांनी सोमवारी आढावा घेतला. संबंधित अधिकारी व कनिष्ठ अभियंता हवेत गोळीबार करीत असल्याचे निदर्शनास येताच जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेतला.

अकोला: मागीलवर्षी बांधण्यात आलेल्या शहरातील इमारतींचे मोजमाप घेऊन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाºया मनपाच्या क्षेत्रीय अधिकाºयांसह नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यप्रणालीचा सोमवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेत संबंधितांचे चांगलेच कान उपटले. त्यांनी झोन अधिकाºयांना कारवाईसाठी आता १५ दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला.मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २०१७-१८ मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतींचे मोजमाप घेऊन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश अडीच महिन्यांपूर्वी क्षेत्रीय अधिकाºयांना दिले होते. त्यासाठी झोन कार्यालयात कार्यरत नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना मोजमाप घेऊन कारवाई करण्याचे निर्देश होते. राज्य शासनाने २०१५ पर्यंतच्या इमारती नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित इमारतींना ‘हार्डशिप अ‍ॅण्ड कॅम्पाउंडींग’ची नियमावली लागू केली, तसेच इमारतींच्या अवाजवी बांधकामाला आळा घालण्यासाठी आॅटोडिसीआर प्रणाली लागू केली. आॅटोडिसीआर प्रणालीद्वारे नकाशा मंजूर केल्यानंतरही प्रत्यक्षात इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त होत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेत पहिल्या टप्प्यात २०१७-१८ मध्ये उभारलेल्या इमारतींचे मोजमाप घेऊन बांधकाम जास्त आढळणाºया इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागाला दिले होते. मागील अडीच महिन्यांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी काय दिवे लावले, याचा आयुक्त वाघ यांनी सोमवारी आढावा घेतला असता, संबंधित अधिकारी व कनिष्ठ अभियंता हवेत गोळीबार करीत असल्याचे निदर्शनास येताच जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेतला.झोन अधिकाºयांना कर्तव्याचा विसरनगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडून इमारतींचे मोजमाप व पुढील कारवाई करून घेण्याची जबाबदारी झोन अधिकाºयांची होती. याठिकाणी झोन अधिकाºयांना कर्तव्याचा विसर पडल्याचे समोर आले. या मुद्यावरून आयुक्त वाघ यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.बिल्डरांना वाचविण्याचा खटाटोप का?शहराच्या कानाकोपºयात कमर्शियल कॉम्प्लेक्स, रहिवासी इमारती, डुप्लेक्सचे मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू आहेत. लहान-मोठ्या झोपड्या हटवताना झोन अधिकारी कायद्याचे पालन करताना दिसतात. नियमांना बासनात गुंडाळून इमारती उभारणाºया बांधकाम व्यावसायिकांना वाचविण्यासाठी मनपातील संबंधित अधिकारी खटाटोप करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.

मे महिन्याचे मानधन कपातशहरातील चारही झोनमध्ये २०१७-१८ मध्ये उभारलेल्या इमारतींचे मोजमाप घेऊन त्यांना नोटीस जारी करणे, नियमापेक्षा जास्त बांधकाम असणाºया इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले होते. कनिष्ठ अभियंत्यांनी सादर केलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी सदर अभियंत्यांचे मे महिन्याचे मानधन कपात करण्याचा निर्णय घेतला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका