शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

महापालिका आयुक्त, अभियंत्यांनी झुगारले दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:16 IST

दबावतंत्राला झुगारत मनपा आयुक्त संजय कापडणीस व बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांनी अनधिकृत केबलचे जाळे शोधून काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दिवसाढवळ््या, रात्री-अपरात्री शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल ३९ किलो मीटर लांबीची अनधिकृत फायबर आॅप्टिक केबल व ‘डक’चे जाळे निर्माण करणाऱ्या एका बडया मोबाईल कंपनीचे धागेदोरे लक्षात घेता या कंपनीच्या विरोधात महापालिका कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित झाला होता. या सर्व शंका-कुशंका व अप्रत्यक्ष असलेल्या दबावतंत्राला झुगारत मनपा आयुक्त संजय कापडणीस व बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांनी अनधिकृत केबलचे जाळे शोधून काढले. या प्रकरणामुळे मनपा प्रशासनाची विश्वासार्हता समोर आली आहे.शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागेत बिनदिक्कतपणे खोदकाम करून एका बड्या मोबाईल कंपनीने मनपा प्रशासनाच्या परवानगीला धाब्यावर बसवित चक्क ३९ किलो मीटर लांबीचे अनधिकृत केबलचे जाळे टाकले. रस्त्यांची तोडफोड, सार्वजनिक जागेचे नुकसान केल्याप्रकरणी कोणत्याही कंपनीला मनपाकडे ‘रिस्टोरेशन चार्ज’(दुरुस्ती शुल्क)जमा करावे लागते. मनपाची परवानगी न घेता तसेच शुल्क जमा न करणाºया कंपनीचा हेकेखोरपणा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणत प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनपाचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब सातत्याने लावून धरण्यात आली. कंपनीचे वलय व धागेदोरे लक्षात घेता कंपनीच्या खिशातून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान आयुक्त संजय कापडणीस यांच्यासमोर निर्माण झाल्याचे चित्र होते.शहर व मनपाच्या हिताची बाब ध्यानात घेता केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे तसेच आमदार रणधीर सावरकर मनपाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याचे यानिमित्ताने दिसून आले.यादरम्यान, मनपाने कंपनीच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यापासून ते थेट संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची नोटीस जारी केली. अखेर नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर वठणीवर येत या मोबाईल कंपनीने २४ कोटी ८ लक्ष रुपये दंडात्मक रक्कम जमा केली.

संचालकांना नोटीस; कंपनीची धावाधावकंपनी जुमानत नसल्याचे पाहून अखेर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी थेट कंपनीच्या संचालकांविरोधात विधीज्ञांमार्फत फौजदारी स्वरूपाच्या कारवाईची नोटीस जारी केली. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. याप्रकरणी कंपनीतून अनेकांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती आहे.

अभियंत्यांवर दबावआयुक्त संजय कापडणीस यांची भूमिका लक्षात घेता बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर, तीन उपअभियंता तसेच १६ कनिष्ठ अभियंत्यांनी डोळ््यात तेल घालून सव्वा महिन्यांच्या कालावधीत ‘त्या’ कंपनीचे अनधिकृत केबल शोधून काढले. यावेळी काही अभियंत्यांवर दबावतंत्राचा वापरही करण्यात आला होता.

ना. धोत्रे म्हणाले होते ही तर चूकच!मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्क सुविधेसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असता, ‘त्या’ मोबाईल कंपनीच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त क रीत अनधिकृत केबलप्रकरणी कंपनीची चूक असल्याचे स्पष्ट केले होते. कंपनीने मनपाची दिशाभूल केल्यास परिणाम भोगण्याचा इशारा आ. रणधीर सावरकर यांनी दिला होता, हे विशेष.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका