शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात होणार मल्टी स्पेशालिटी पशू रुग्णालय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:23 IST

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) अकोला येथे पहिले शैक्षणिक मल्टिस्पेशालिटी  पशुवैद्यकीय रुग्णालय होणार असून, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय)  योजनेंतर्गत शासनाने १५ डिसेंबर रोजी साडेचार कोटी रुपये मंजूर केले. यामुळे वर्‍हाडा तील पशूंवर अत्याधुनिक उपकरणाने उपचार करणे सोयीचे होईल.

ठळक मुद्दे‘आरकेव्हीवाय’ अंतर्गत ४.५0 कोटी रुपये मंजूर; वर्‍हाडातील पशूंवर होणार अत्याधुनिक  उपकरणाने उपचार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) अकोला येथे पहिले शैक्षणिक मल्टिस्पेशालिटी  पशुवैद्यकीय रुग्णालय होणार असून, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय)  योजनेंतर्गत शासनाने १५ डिसेंबर रोजी साडेचार कोटी रुपये मंजूर केले. यामुळे वर्‍हाडा तील पशूंवर अत्याधुनिक उपकरणाने उपचार करणे सोयीचे होईल. पश्‍चिम विदर्भात ७५00 चौरस किमी क्षेत्रात पूर्णा नदी विस्तारली असून, या नदीच्या क्षेत्रा तील चार हजार चौरस किमीवरील ८९४ गावे खारपाणपट्टय़ात मोडतात. खारपाणपट्टय़ा तील पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असल्याने पशू आणि पक्ष्यांवर विपरीत परिणाम होत  असल्याचा अभ्यास अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे विद्यार्थी  आणि शास्त्रज्ञांनी केला आहे. इतरही गंभीर स्वरू पाचे आजार पशुधनावर होत असल्याने  त्यांच्यावर योग्य उपचार होण्यासाठी येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे  प्रकल्प प्रमुख डॉ. सुनील वाघमारे यांनी शासनाकडे रुग्णालयासाठीचा प्रकल्प सादर केला  होता. त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या २३ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या  बैठकीमध्ये या प्रकल्पास मंजुरी प्रदान करण्यात आली, तर १५ डिसेंबर रोजी साडेचार  कोटी रुपये खर्चास वित्तीय मंजुरात देण्यात आली.महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठांतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान  संस्था येथे हे रुग्णालय होणार असून, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल एक्सरे,  एन्डोस्कोपी, लॅप्रोस्कोपी सर्जरी, बधिरीकरण उपकरण, झटपट रक्त, मलमूत्र तपासणी उ पकरणे रुग्णालयात बसवली जाणार आहेत. त्यावर ३ कोटी २६ लाख रुपये खर्च केले  जातील. पशूला उचलण्यासाठी स्वयंचलित यंत्र लावण्यात येणार आहे. रुग्णालयाचे बांधकाम, नू तणीकरणावर उर्वरित खर्च केला जाईल.

प्रशिक्षणाची सोय शैक्षणिक मल्टिस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयात जिल्हा, तालुका स्तरावरील  पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन अधिकार्‍यांना अद्ययावतीकरणावर प्रशिक्षण दिले जाईल.  त्यासाठीची व्यवस्था केली जाणार आहे. 

अस्तित्वात असलेल्या रू ग्णालयाचे बळकटीकरण करण्यात येणार असून, मल्टिस् पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयात रू पांतर करण्यात येणार आहे. यामुळे पश्‍चिम विदर्भा तील पशूंवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करणे सोपे होईल. अनेक दुर्धर आजारांवर  निदान करू न उपचार केले जातील.- डॉ. हेमंत बिराडे, सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर