शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड : युवकाची हत्या करणार्‍या आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:30 AM

अकोला : आरोपीने स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी ट्रकमध्ये नेण्यास नकार देणार्‍या युवकावरसुद्धा धारदार गुप्तीने वार करून हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १0 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

ठळक मुद्देआई व मित्रावरही प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आरोपीने स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी ट्रकमध्ये नेण्यास नकार देणार्‍या युवकावरसुद्धा धारदार गुप्तीने वार करून हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १0 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मनोज पेंढारकर याने पातूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ मुकेश मधुकर पेंढारकर(२६) हा मिनी ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. सात महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. २३ डिसेंबर २0१३ रोजी चिखलगाव येथील बसस्टँडवर मुकेश हा रक्ताच्या थारोळय़ात पडला असल्याची माहिती मिळाली. मुकेश हा त्याच्या मिनी ट्रकमध्ये महावितरणचे काही साहित्य घेऊन अकोल्याला जात होता. दरम्यान, आरोपी गोपाल सरप याने त्याच्या जखमी आईला रुग्णालयात नेण्यासाठी मुकेशला विनवणी केली; परंतु मुकेशने त्याला नकार दिल्यामुळे संतप्त गोपालने त्याच्यावर गुप्तीने हल्ला केला. जखमी अवस्थेतच मुकेश पेंढारकर याला सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात मनोज पेंढारकर याने पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गोपाल सरप याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपी गोपालने मुकेशची हत्या करण्यापूर्वी स्वत:ची आई सुनंदा सरप आणि मित्र विलास पांडुरंग वानखडे यांच्यावरही गुप्तीने वार करून त्यांना जखमी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून गुप्ती जप्त केली आणि भादंवि कलम ३0७, ३0४, आर्म अँक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून गोपालला अटक केली.  सुनावणीदरम्यान न्यायालयाने १९ साक्षीदार तपासले. चार साक्षीदार फितूर झाले. आरोपी गोपाल सरप याच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  आई व मित्रावर हल्ला प्रकरणातसुद्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित कलम ३0७ मध्ये ७ वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि कलम ३२४ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला ए. पांडे यांनी बाजू मांडली. 

आई व मित्राने घेतली आरोपीची बाजूमुकेश पेंढारकर याच्या हत्या प्रकरणात आरोपीची आई सुनंदा सरप व मित्र विलास वानखडे यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले होते; परंतु न्यायालयात मात्र या दोघांनी सुनावणीदरम्यान आरोपी गोपाल सरप याने त्यांच्यावर हल्ला केला नसल्याचे सांगितले.

अशी घडली घटनागोपाल सरप हा मद्यपी असून, २३ डिसेंबर रोजी त्याने व मित्र विलास वानखडे यांनी सोबत मद्य प्राशन केले. विलासने अधिक मद्य प्राशन करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यात गोपालने विलासवर गुप्तीने वार केले. यात विलास किरकोळ जखमी झाला. त्यानंतर विलासने पातूर पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, गोपालची आई सुनंदा सरप हिला गोपाल मद्यधुंद अवस्थेत बसस्टँडवर गोंधळ घालत असल्याचे कळल्यावर ती बसस्टँडवर आली आणि तिने गोपालची समजूत घातली; परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने, तिने त्याला एक थापड मारली. यामुळे संतप्त गोपालने आईवरही गुप्तीने वार करून तिला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या आईला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तो मिनी ट्रकचालक मुकेश पेंढारकर याच्याकडे गेला आणि त्याला आईला ट्रकमधून रुग्णालयात नेण्याची विनवणी करू लागला; परंतु मुकेशने त्याला नकार दिल्याने, त्याने त्याच्यावरही गुप्तीने वार केले आणि त्याची हत्या केली. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हाCourtन्यायालयMurderखून