शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मूग, उडीद खरेदीला सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:49 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील शासकीय मूग, उडीद खरेदीसाठी शुक्रवारी अकोला येथे एक व यवतमाळ जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी इतर जिल्ह्यात हमी दराने खरेदी केंद्रं सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देवर्‍हाडात अकोला व यवतमाळ जिल्ह्यात तीन  केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामातील शासकीय मूग, उडीद खरेदीसाठी शुक्रवारी अकोला येथे एक व यवतमाळ जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी इतर जिल्ह्यात हमी दराने खरेदी केंद्रं सुरू केली जाणार असल्याचे वृत्त आहे. मूग, उडीद खरेदीसाठी ३ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार विभागातही खरेदी केंद्रं सुरू होणे अपेक्षित होते. तथापि  ग्रेडरच पूरक प्रमाणात न मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यात विलंब होत आहे. तसेच मूग, उडिदात असलेला ओलावा हेदेखील एक कारण सांगितले जात आहे.अकोला येथील जिनिंग अँण्ड प्रेसिंगच्या आवारात जिल्हा निबंधक सहकारी संस्था मावळे यांच्या हस्ते अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी हमीदराने नाफेडमार्फत मूग, उडीद खरेदीला सुरुवात झाली. अकोला जिल्हय़ात एकच केंद्र सुरू करण्यात आले. हमीदरानुसार मुगाला ५,५७५ रुपये प्रतिक्विंटल, तर उडिदाला ५,४00 रुपये दर मिळणार आहेत. तसेच सोयाबीनचीही हमीदाराने खरेदी सुरू असून, सोयाबीनला ३ हजार ५0 रुपये तसेच ३0५ रुपये मिळून ३,३५५ रुपये दर दिले जात आहेत.खरेदी कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा विपणन अधिकारी बजरंग ढाकरे, संजय कोरपे, तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक नरेंद्र वैराळे,  ग्रेडर गावंडे यांच्यासह ताखविसंचे मोजणी कर्मचारी, शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद अणि दिग्रस येथे मूग, उदीड खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली. 

१२ टक्के ओलावा असावा!शासकीय  खरेदी केंद्रावर १२ टक्के ओलावा असलेल्या मूग, उडिदाची खरेदी केली जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांना शेतीचा ७/१२ उतारा व पेरेपत्रक सोबत आणणे अनिवार्य आहे.

सोमवारी होणार इतर केंद्रं सुरू!वर्‍हाडातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा येथील खरेदी केंद्रं सुरू केली जाणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ११ खरेदी केंद्रांची तयारी करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात एक शासकीय मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू केले आहे. ग्रेडरची उपलबद्धता जशी होईल, तसे इतर केंदं्र सुरू केले जातील.- मनोज वाजपेयी,अधिकारी, नाफेड, अकोला.

टॅग्स :agricultureशेती