शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

सातही तालुक्यांत मूग खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 15:01 IST

विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्यावतीने मूग खरेदी करण्यात येत आहे.

अकोला: मुगाचा काढणी हंगाम संपल्यानंतर शासनाला जाग आली असून, २ व ३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील सात तालुक्यांत मूग खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. तथापि, शेतकऱ्यांनी गरजेपोटी अगोदरच बाजारात मूग विकल्याने या खरेदी केंद्रांवर शेतकºयांचा अल्प प्रतिसाद आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन तालुक्यांतील ज्या शेतकºयांनी १५ सप्टेंबरपासून आॅनलाइन नोंदणी केली, त्या शेतकºयांकडील मूग खरेदी २ आॅक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आली. अकोला तालुक्यात नोंदणी केलेल्या ५०, मूर्तिजापूर तालुक्यातील ६७ पैकी २५ तर अकोट तालुक्यातील नोंदणी केलेल्या १४९३ शेतकºयांपैकी ५० शेतकºयांकडील मूग खरेदी करण्यात येणार आहे. तथापि, शेतकºयांचा प्रतिसादच नसल्याने अकोट व अकोला खरेदी केंद्रावर प्रत्येकी ३ व ५ क्ंिवटलच मूग खरेदी करण्यात आला आहे. ३ आॅक्टोबर रोजी उर्वरित चार तालुक्यांत मूग खरेदी सुरू करण्यात आली आहे. यावर्षीचे हमीदर प्रतिक्ंिवटल ७०५० रुपये आहेत. तथापि, त्यासाठी नाफेडच्या निकषात बसणारा मूग शेतकºयांना विक्रीस न्यावा लागणार आहे. विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाच्यावतीने मूग खरेदी करण्यात येत आहे.हमीभावाने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यासाठीची नोंदणी १५ सप्टेंबरपासून ‘नाफेड’तर्फे सुरू करण्यात आली आहे. मूग विक्रीसाठी नेताना शेतकºयांनी अद्ययावत आॅनलाइन सातबारा, आधार कार्ड लिंक असलेले झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स नोंदणी केंद्रावर आणणे आवश्यक आहे. दरम्यान, मूग व उडीद नोंदणी शेतकºयांना ३० आॅक्टोबरपर्यंत करता येणार आहे. तीन तालुक्यांतील शेतकºयांनी त्यांच्याकडील मूग, उडीद विक्रीसाठी आणावा, अशी माहिती विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा पणन व्यवस्थापकांनी दिली.

 नोंदणी केलेल्या सातही तालुक्यांतील शेतकºयांकडील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शेतकºयांनी या केंद्रांवर मूग विक्रीसाठी आणावा, त्यासाठीची नोंदणी ३० आॅक्टोबरपर्यंत सुरू आहे. विक्रीबाबत शेतकºयांना काही अडचणी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अकोला तसेच संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी