शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा वरठे ‘सेकंड रनर-अप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:30 IST

‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन २०१८’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा विनीत वरठे यांनी द्वितीय उपविजेतेपदाचा (सेकंड रनरअप)बहुमान मिळाला आहे.

ठळक मुद्दे राजस्थानच्या डॉ. नीतू लाहोटी या मिसेस इंडिया ब्युटी क्लासिक २०१८ म्हणून घोषित झाल्या. हेमॅक्सी वनवाला, डॉ. प्रज्ञा वरठे, आंग्ली सक्सेना यांना अनुक्रमे ‘फर्स्ट’, ‘सेकंड’ आणि ‘थर्ड’ रनरअप म्हणून घोषित करण्यात आल्या.

अकोला : राज्य व राष्ट्रीय  स्तरावर विवाहित महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता वाव्ह फाउंडेशनतर्फे चंदीगड येथे गत आठवड्यात घेण्यात आलेल्या ‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन २०१८’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा विनीत वरठे यांना  द्वितीय उपविजेतेपदाचा (सेकंड रनरअप)बहुमान मिळाला आहे.या स्पर्धेत देशभरातून विविध महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेत राजस्थानच्या डॉ. नीतू लाहोटी या मिसेस इंडिया ब्युटी क्लासिक २०१८ म्हणून घोषित झाल्या. गुजरातच्या हेमॅक्सी वनवाला, महाराष्टÑातून अकोलाच्या डॉ. प्रज्ञा वरठे, लखनवच्या आंग्ली सक्सेना यांना अनुक्रमे ‘फर्स्ट’, ‘सेकंड’ आणि ‘थर्ड’ रनरअप म्हणून घोषित करण्यात आल्या. डॉ. प्रज्ञा या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विनीत वरठे यांच्या पत्नी आहेत. या स्पर्धेत विविध प्रकारची वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा, औपचारिक गाउन, आयक्यू राउंड, टॅलेंट क्यू राउंड, टॅलेंट राउंड, फिटनेस राउंड इ. प्रकारचे राउंड घेण्यात आले. या विविध राउंडकरिता देशातील नामांकित डिझायनर व मॉडेल्स परीक्षक म्हणून लाभले.या राष्टÑीय स्पर्धेतील विजेता विश्वस्तरावर चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेतील, तर रनरउप कॅनडा येथे पुढील आंतरराष्टÑीय स्पर्धेत भारतातर्फे भाग घेतील.

 

टॅग्स :Akolaअकोला