शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीचे प्रदर्शन टाळण्यासाठी  खासदार-नामदारांची भाषणे नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:31 IST

भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे. 

ठळक मुद्देभाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी घेतला प्रमुख पदाधिकार्‍यांचा वर्ग 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे भाजपच्या संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी अकोल्यात आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा वर्ग घेत, संघटन कार्यावर प्रश्नांची सरबत्ती करून, पदाधिकार्‍यांना घाम फोडला. सरोज पांडे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, अनेक आघाड्यांचे पदाधिकारी चाचपडत होते. सरोज पांडे यांनी भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाचा आढावा आणि त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली. जे पदाधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत, त्यावर नाराजी व्यक्त करीत, नेते म्हणून पदे बळकावली. त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशा शब्दात खडेबोल सुनावले.  यावेळी मंचावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे संघटनमंत्री उपेंद्र कोठीकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, अँड. मोतीसिंह मोहता व श्रावण इंगळे आदींची उपस्थिती होती.  या नेत्यांपैकी सरोज पांडे यांचे व्यतिरिक्त तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठीकर यांनाच भाषणाची संधी मिळाली. त्यामुळे मंचावर उपस्थित लोकप्रतिनिधींना केवळ मंचावर स्थान ग्रहण करून बसून राहणे एवढेच कार्य उरले होते. संघटनात्मक आढावा असल्यामुळे संघटनेत काम करणार्‍या पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. हे सर्मथन पक्षपातळीवर कदाचित असू शकते मात्र, भाषणाच्या माध्यमातून मतभेद समोर येऊ नये म्हणूनच लोकप्रतिनिधींची भाषणे टाळली असावी, अशी चर्चा आता राजकीय वतरुळात सुरू झाली आहे. -