अकोला : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यात झपाट्याने वाढलेली महिला बचत गटांची चळवळ आता कागदोपत्री उरली असून, महिलांना खर्या अर्थाने स्वत:च्या पायावर उभे करायचे असेल तर बचत गटांचे काम कागदपत्रापुरते र्मयादित न ठेवता ते गतिमान करावे लागणार असल्याचे प्रतिपादन बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आर्थिक विकास महिला महामंडळ व रिलायंस फाउंडेशनच्यावतीने २७ मार्च रोजी आयोजित विदर्भातील कर्तबगार महिलांचा स त्कार व सन्मान सोहळा कृषी विद्यापीठाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पवार बोलत होत्या. सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.आर.जी. दाणी होते. व्यासपीठावर कुलसचिव ज्ञानेश्वर भारती, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी डॉ.व्ही.एम. भाले यांची उपस्थिती होती. पवार यांनी महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने अनेक अभिनव कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. बाजाराची गरज ओळखून कोणती उत् पादने घ्यावीत, यासाठी भीमथडी जत्रेच्या माध्यमातून या भागात बाजारपेठ सुरू केली आहे. आजमितीस बारामती भागात ८५ महिलांचे व्यवसाय सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना अनेक संधी असून, राजकीय क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पण, त्यासाठी महिला राजकीय परिपक्ववता निर्माण करावी लागणार असून, रिमोट कंट्रोलचा ठपका पुसण्याची खरी गरज असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी चिंता व्यक्त करताना बारामती कृषी विकास प्रतिष्ठान या बाबतीत महिलांना सक्षम करण्यावर भर देत असल्याचे सांगितले. डॉ. दाणी यांनी या कृषी विद्यापीठाने डिसेंबरमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यातून अनेक विषय हाताळण्यात आले असून, त्याचे चांगले परिणाम मिळत असल्याचे सांगितले. या महिला दिनाच्या माध्यमातून महिलांनी प्रेरणा घ्यावी, कृषी विद्यापीठाचा हाच उद्देश असल्याचे ते म्हणाले. डॉ. इंगोले यांनी महिलांच्या सत्कारामागील उद्देश व भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले. तेजस्विता बडगुजर व गंगा देशमुख यांनी महिला प्रतिनिधी म्हणून विचार मांडले. या महिला सोहळ्य़ाला हास्य कवी अँड.अनंत खेळकर यांनी बहार आणली. या सोहळ्य़ाना महिलांचा भरभरू न प्रतिसाद लाभला.
महिला बचत गटांची चळवळ कागदावरच- सुनंदा पवार
By admin | Updated: March 28, 2015 01:53 IST